पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडमधील कॅनल रोडवरील रेड ओक स्पा नावाचं स्पा सेंटर सूरू होते. या स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली भलताच प्रकार सुरु होता. पोलिसांना या घटनेची माहिती काही गोपनिय सुत्रांकडून माहिती मिळाली होती. त्यामुळे या माहितीची पुष्टी करण्यासाठी पोलिसांना एका व्यक्तीला डमी ग्राहक बनून स्पा सेंटरमध्ये पाठवले होते. या दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीत सत्यता आढळली होती. त्यामुळे पोलिसांना संबंधित स्पा सेंटरवर छापा टाकून कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता.
advertisement
त्यानुसार पोलिसांनी रेड ओक स्पावर छापा टाकला होता. यावेळा पोलिसांनी या स्पामधून 4 निष्पाप मुलींची सुटका केली आहे. यामधील तीन मुली या नागपूरच्या आहेत तर एक मुलगी ही आसामची होती. पोलिसांनी या छापेमारीत 16 हजार 560 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तसेच स्पा सेंटरमधून नागसेन गायकवाड (वय 20), संतोष इंगळे (वय 22 ), रोहन गायकवाड (वय 20) या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर स्पा सेंटरचा मालक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पदाधिकारी अमोदसिंग साबळे (वय 27), मॅनेजर पंकज मनोज जांगड (वय 27) हे दोघे फरार आहेत.या दोघांचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.दरम्यान या प्रकरणी भाग्यनंगर पोलिसांनी या पाचही आरोपींवर कलम 3,4,5(1),(ड) अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा अधिकचा तपा सूरू आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी मास्टरमाईंड
दरम्यान या प्रकरणात जो आरोपी फरार आहे, अमोदसिंग साबळे (वय 27), हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पदाधिकारी आहे. अमोदसिंग साबळे हा शिवसेनेचा दक्षिण युवा सेना जिल्हाध्यक्ष आहे. आणि हाच व्यक्ती स्पा सेंटरच्या नावाखाली अवैधपणे चालवणाऱ्या वैश्या व्यवसाय चालवणाऱ्या या स्पा सेंटरचा मालक आहे.