मिळालेल्या माहितीनूसार नांदगाव-मनमाड महामार्गावर दोन दुचाकी चालक एक समोरून तर दुसरा विरूद्ध दिशेने भरधाव वेगाने प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान दोघांची समोरासमोर भीषण धडक बसली होती.ही धडक इतकी जोरात बसली होती की दोघेही दुचाकी चालक दुरपर्यंत फेकले गेले होते आणि महामार्गावर रक्ताचा सडा पडला होता.
हा अपघात इतका भीषण होता की दोघांच्या गाडींचा चक्काचूर झाला होता.या अपघातात दिगंबर अहिरे आणि फकीर गांगुर्डे या दोन दुचारीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या दोन दुचाकीस्वारांच्या मागे बसलेले दोघे जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.या जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
advertisement
दरम्यान या गंभीर अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.तसेच या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दोनशे फूट खोल दरीत कोसळली
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगांव मार्गावर पिनाकेश्वर महादेव घाटात अपघाताची घटना घडली आहे. देवदर्शन करून परतत असताना भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. कांताबाई नारायण गायके (वय 56) आणि कमलबाई शामराव जगदाळे (वय 62) अशा या महिलांची नावे आहेत. तर आणखी 13 भाविक गंभीर जखमी आहेत.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पिनाकेश्वर महादेव घाटात आज सायंकाळी पाच वाजेच्या सूमारास ही घटना घडली आहे. सर्व भाविक जातेगांव जवळ असलेल्या महादेव मंदिर येथून दर्शन घेऊन परत जात असतांना हा अपघात झाला आहे. चालकाचा नियंत्रण सुटल्यामुळे ट्रॅक्टर-ट्रॉली सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात (कांताबाई नारायण गायके (56)रा. खामगाव ता. कन्नड) व (कमलबाई शामराव जगदाळे (62)रा. जानेफळ ता. वैजापूर) या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर भाविकांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागांना मार लागला आहे. चेतन प्रकाश कवडे, प्रणिता प्रकाश कवडे, माया प्रकाश कवडे, अप्पा सोपान राऊत, श्रावणी अप्पा राऊत, कल्याणी राजेंद्र कवडे, साई कवडे, प्रगती सोमनाथ नवले, आदित्य योगेश कवडे आदी भाविक जखमी झाले आहेत.