Nashik Crime News : इंदापूर, प्रतिनिधी : नाशिकच्या इंदापूरमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत फेसबूक आणि इस्टाग्राम या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर Hi पाठवायचा आणि पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत तो महिलेसोबत भयंकर कांड करायचा . तब्बल 4 पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरोधात तक्रार दाखल होती.याचा अर्थ त्याने काय कांड केलेत याची कल्पना न केलेलीच बरी. आता या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गणेश शिवाजी कारंडे असे या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी नेमकं महिलांसोबत काय काय करायचा हे जाणून घेऊयात.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कारंडे हा आरोपी फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून पहिल्यांदा महिलांशी ओळख करायचा.त्यानंतर आपण पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करायचा. विशेष म्हणजे तो फेसबुकवर ‘संग्राम पाटील’ आणि ‘पृथ्वीराज पाटील’ या नावाने बनावट प्रोफाइल तयार करायचा आणि स्वतःला पोलिस अधिकारी म्हणून दाखवायचा. एकदा एका महिलेचा त्याच्यावर विश्वास बसला की तो सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन त्यांची फसवणूक करायचा.
तसेच या आरोपीवर एका महिलेला व्यावसायिक मदत करण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून दागिने व पैसे घेऊन फसवणूक केल्याचा आणि तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा गंभीर गुन्हा त्याच्यावर नोंदवण्यात आला आहे. अशा या सराईत गुन्हेगाराने आतापर्यंत अनेक महिलांना आपला शिकार केले होते.त्यामुळेच त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
भिगवण पोलिसांनी संगणकीय विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे अकलूज परिसरातून या आरोपीला अटक केली आहे.आरोपीचे नाव गणेश शिवाजी कारंडे आहे. भिगवण पोलिसांनी या आरोपीकडून सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्याच्यावर यापूर्वी अकलूज, मंगळवेढा, पंढरपूर आणि लोणंद पोलीस ठाण्यांमध्ये महिलांवरील अत्याचार व फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई भिगवण पोलिस ठाण्याचे पथकाने केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
