भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि संपर्कासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारणेबाबतचा अभ्यास करण्याचे प्रमुख काम समिती अध्यक्षांच्या निरीक्षणाखाली सदस्य करतील. ही समिती अभ्यास करुन पॉवर पॉईंट प्रेझेंन्टेशन (PPT) सह अहवाल शासनास सादर करणार आहे. मात्र,शासनास आवश्यकतेप्रमाणे सुधारणा सुचविण्याचे अधिकार राहतील
नाशिकमधील 2027 चा कुंभमेळा 'डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ' म्हणून ओळखला जावा यासाठी नियोजन केलं जाणार आहे. संपूर्ण कुंभमेळ्यामध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः गर्दीचे आणि वाहतुकीचे नियोजन यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
advertisement
कुंभमेळ्यासाठी भाविकांना उत्कृष्ट प्रकारची अनुभूती मिळेल अशा पध्दतीच्या प्रदर्शनी डिजीटल, ऑडिओ व्हिजवल्स, interactive, आर/व्हीआर अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. कुंभमेळा काळात मोबाईल कनेक्टिव्हीटी उत्तम राहण्यासाठी विशेष योजना आखण्याचे नियोजन समितीकडे आहे.
त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 2027 विशेष अभ्यास समितीचं गठण, समितीत कोण कोण?
-संचालक, माहिती आणि तंत्रज्ञान संचालनालय
- व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ,मुंबई
- उपसचिव, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग
- विजय पाटील, माहिती तंत्रज्ञान संचालनालय (DIT)
- आलोक मिश्रा, माहिती तंत्रज्ञान संचालनालय (DIT)
- विभागीय आयुक्त, नाशिक यांचे प्रतिनिधी
- कक्ष अधिकारी (तांत्रिक)