दरम्यान, आज (दि. १६) रोजी शहरातील विविध मतमोजणी केंद्रांवर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम टपाली मतदानाची मोजणी करण्यात येत असून, त्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. सकाळपासूनच मतमोजणी केंद्रांबाहेर उमेदवारांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि समर्थकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
मात्र, मतमोजणीच्या सुरुवातीलाच काही प्रभागांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकच्या प्रभाग क्रमांक २०, २१ आणि २२ मधील उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी अद्याप मतमोजणी केंद्रात प्रवेश न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत आहेत. यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. तसेच प्रभाग क्रमांक २५, २६ आणि २८ मधील मतमोजणी अद्याप सुरू झालेली नसल्याने संबंधित उमेदवार आणि समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे.
advertisement
नाशिकरोड महापालिका विभागीय कार्यालयात मात्र नियोजित वेळेनुसार मतमोजणीला सुरुवात झाली असून, येथे सर्वप्रथम टपाली मतदानाची मोजणी केली जात आहे. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून, सर्व प्रक्रिया नियमांनुसार पार पाडली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये कोण आघाडीवर?
मतमोजणीच्या प्राथमिक टप्प्यात टपाली मतदानातून काही प्रभागांतील आघाडी स्पष्ट होऊ लागली आहे. नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक २५ मध्ये टपाली मतदानाच्या मोजणीत भाजपचे उमेदवार सुधाकर बडगुजर आघाडीवर आहेत. नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक २९ मध्ये टपाली मतदानात अपक्ष उमेदवार मुकेश सहाणे यांनी सुरुवातीची आघाडी घेतली आहे.
शिंदे गटाचे उमेदवार विलास शिंदे आघाडीवर
नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक ८ मधून टपाली मतादानात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास शिंदे आघाडीवर
प्रभाग १३ मध्ये भाजपचे उमेदवार पहिल्या फेरीत कोण आघाडीवर?
अदिती पांडे, हितेश वाघ, शाहू खैरे,बबलू शेलार
नाशकात भाजपचे दोन बंडखोर आघाडीवर
मुकेश शहाणे आणि शशिकांत जाधव आघाडीवर
नाशिक महानगरपालिका सध्याची अपडेट
एकुण जागा- १२२
कल - १८
भाजप - ०६
शिंदेंची शिवसेना - ०४
राष्ट्रवादी अजित पवार - ०२
ठाकरेंची शिवसेना - ०२
काँग्रेस -
मनसे-०१
राष्ट्रवादी शरद पवार गट - ०१
आरपीआय - ०१
इतर - ०१
शिंदेंचा कल वाढता
नाशिक प्रभाग 13 रश्मी भोसले शिवसेना शिंदे आघाडीवर आदिती पांडे भाजप पिछाडीवर
प्रभाग 15 ची मतमोजणी थांबली
मशीनमध्ये मतदान वेळ साडेपाच असताना पाच वाजून 21 मिनिटांनी मशीन बंद झाल्याचं आढळून आलं त्यामुळे मतमोजणी थांबवून निवडणूक निर्णय अधिकारी यावर माहिती घेत आहे.
नाशिक प्रभाग : 14 आघाडी कुणाची?
अर्पिता गांगुर्डे राष्ट्रवादी ap
बुशरा आसिफ : राष्ट्रवादी ap
समिया सुमेर : काँग्रेस
सुफी जीन : काँग्रेस
अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे आघाडीवर
नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 29 पहिल्या तीन फेऱ्या अखेर अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे आघाडीवर
प्रकाश लोंढे आघाडीवर
नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 11 मधून पहिल्या फेरीत कारागृहातून निवडणूक लढवणारे आरपीआय उमेदवार प्रकाश लोंढे आघाडीवर
सध्या कुणाची आघाडी?
एकुण जागा- १२२
आघाडी - ३३
भाजप - १३
शिंदेंची शिवसेना - ०७
राष्ट्रवादी अजित पवार - ०२
ठाकरेंची शिवसेना - ०३
काँग्रेस - ०३
मनसे-०१
राष्ट्रवादी शरद पवार - ००
आरपीआय - ०२
इतर - ०२
माहिती अपडेट होत आहे....
