नाशिक महानगर पालिकेमध्ये, अग्निशमन दलात 186 पदांसाठी नोकरभरती पार पडत आहे. चालक-यंत्र चालक किंवा वाहन चालक(अग्निशमन) आणि फायरमन (अग्निशामक) अशा दोन विभागांमध्ये, नोकरभरती केली जात आहे. ही भरती गट- क आणि गट- ड मध्ये केली जात आहे. एकूण 186 जागांवर ही भरती होत असून चालक-यंत्र चालक किंवा वाहन चालक(अग्निशमन) पदासाठी 36 जागांसाठी तर, फायरमन (अग्निशामक) पदासाठी 186 जागांवर नोकरभरती केली जात आहे. दोन्हीही पदांसाठी महिला आणि पुरूष अशा दोन्हीही वर्गांसाठी नोकर भरती होत आहे. नाशिक महानगर पालिकेकडून जाहीर केलेल्या शारिरीक पात्रतेमध्ये नमूद केलेले आहे.
advertisement
अधिकृत जाहिरातीची लिंक - https://drive.google.com/file/d/1hp5l3Lhssg-5eCe0d9FpL0CfFGt2xClr/view
अर्जाची लिंक - https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32773/93396/Index.html
अधिकृत वेबसाईट - https://nmc.gov.in/
पुरूषांसाठी उंची 165 सेमी, छाती 81 सेमी, फुगवून 05 सेमी पेक्षा जास्त आणि वजन 50 KG इतके आहे. तर, महिलांसाठी उंची 157 सेमी, छातीसाठी काहीही मोजमाप दिलेले नाही आणि वजन 46 KG ची आवश्यकता आहे. चालक-यंत्र चालक/वाहन चालक (अग्निशमन) पदासाठी 10वी उत्तीर्ण, राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण केलेला असावा किंवा वाहनचालक म्हणून किमान 03 वर्षे काम केल्याचा अनुभव अशा शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता आहे. तर, फायरमन (अग्निशामक) पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण केलेला अशी शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता आहे.
तर, अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 28 वर्षे इतके पूर्ण असावे. मागासवर्गीय, अनाथ किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या घटकातील उमेदवारांना 05 वर्षांची सूट आहे. खुला प्रवर्गातील उमेदवारांची परीक्षा फी 1000रू. असून मागासवर्गीय आणि अनाथ उमेदवारांची फी 900 रू इतकी असेल. चालक-यंत्र, चालक किंना वाहन चालक (अग्निशमन) या पदांसाठी 19,900/- ते 63,200/- इतका पगार मिळेल. तर, फायरमन (अग्निशामक) पदासाठी 19,900/- ते 63,200/- इतका पगार मिळेल.
