नाशिक ग्रामीण पोलीस दल शिपाई, ड्रायव्हर आणि मध्यवर्ती कारागृहातील पोलीस शिपायांच्या रिक्त पदांसठी भरती केली जाणार आहे. या तिन्ही पदांच्या 380 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलातील शिपायांसाठी 210 रिक्त पदे, ड्रायव्हरसाठी 52 रिक्त पदे आणि मध्यवर्ती कारागृहातील पोलीस शिपायांसाठी 118 रिक्त पदे अशा रिक्त जागा आहेत. अशा एकूण 380 रिक्त जागा आहेत. येत्या 20 फेब्रुवारी रोजी ही भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. नेमकी ही पोलीस भरती कोणत्या ठिकाणी होणार आहे, याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
advertisement
नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी ग्रामीण पोलिस दलाच्या भरतीसंबंधीतची अधिसुचना जारी केलेली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याआधी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ग्रामीण पोलिस दलामध्ये जम्बो मेगाभरती केली जात आहे. देशासह जगभरातून करोडोंच्या संख्येने भाविक नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी दाखल होणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर भाविकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाकडून पोलिसांची भरती केली जात आहे. यापूर्वी 2023 मध्ये 150, तर 2024 साली 32 जागांवर भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. दरम्यान 2022 ते 2025 दरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना भरतीसाठी अखेरची संधी देण्यात आली आहे.
भरती प्रक्रियेत गैरप्रकार टाळण्यासाठी दक्षता पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. धावणे, बॉडी चेकअप, डॉक्युमेंट व्हेरिफेकशन, गोळाफेक अशा मैदानी चाचणी पार पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तरुण- तरुणी या भरतीची तयारी करत होते. आता त्या सर्वांचे लवकरच खाकी वर्दीचं स्वप्न सत्यात उतरणार आहे.
