TRENDING:

प्रकाश लोंढे गँगचा माज मोडला, टोळीला जबर दणका, नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

Last Updated:

Prakash Londhe Gang: प्रकाश लोंढेसह त्याचा मुलगा दीपक लोंढे गोळीबाराच्या गुन्ह्यात अटकेत आहेत. गोळीबार आणि खंडणीच्या अनेक प्रकरणांत त्यांचा सहभाग आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी, नाशिक : सातपूर गोळीबार आणि अनेक खंडणी प्रकरणांमध्ये आरोपी करण्यात आलेल्या आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आणि त्यांचा पुत्र दीपक लोंढे यांना नाशिक पोलिसांनी जबर दणका दिला. पी एल ग्रुपचा सूत्रधार प्रकाश लोंढेसह साथीदारांवर मकोका कायद्याअन्वये कारवाई करण्यात आली आहे.
नाशिक पोलिसांकडून लोंढे गँगवर मकोका
नाशिक पोलिसांकडून लोंढे गँगवर मकोका
advertisement

सातपूर आणि अंबड या औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांना अडवून लुटमार केली जाते, कुणाला धमकावले जाते. दुकानदारांकडून हफ्ते मागितले जातात. नकार दिला तर त्यांना मारहाण केली जाते. एकंदरित या परिसरात लोंढे गँगची दहशत मोठी आहे. राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे सांगून आम्हाला कुणीच हात लावू शकत नाही, असे लोंढे गँगमधील सदस्य अप्रत्यक्षपणे वागण्यातून सांगत होते. त्याच आरोपींचा माज नाशिक पोलिसांनी मोडला.

advertisement

लोंढे गँगला जबर दणका

प्रकाश लोंढेसह त्याचा मुलगा दीपक लोंढे गोळीबाराच्या गुन्ह्यात अटकेत आहेत. गोळीबार आणि खंडणीच्या अनेक प्रकरणांत त्यांचा सहभाग आहे. या टोळीने अनेकांना त्रास दिलेला आहे. प्रकाश लोंढे हा आहे आरपीआयचा उत्तर महाराष्ट्र प्रमुख आहे. मला कुणी काही करणार नाही, अशाच अविर्भावात तो वावरत असायचा. मात्र पोलिसांनी पुढेमागे न पाहता नाशिकची कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या लोंढे गँगला जबर दणका दिलाय.

advertisement

प्रकाश लोंढे अटकेत असला तरी त्याचा पुत्र भूषण लोंढे अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. लोंढे गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करून दिवाळीनंतरही नाशिक पोलिसांची फटाकेबाजी सुरूच आहे.

सातपूर गोळीबार प्रकरणी लोंढे गँगवर गुन्हा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

प्रकाश लोंढे, दिपक लोंढे, संतोष पवार, अमोल पगारे यांच्यावर सातपूर येथील गोळीबाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबारात जखमी मेश्राम कुटुंबाचे अपहरण केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
प्रकाश लोंढे गँगचा माज मोडला, टोळीला जबर दणका, नाशिक पोलिसांची मोठी कारवाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल