TRENDING:

अशोक खरात दुसऱ्या गुन्ह्यात SIT च्या ताब्यात, जेलमधून ताबा घेतला, पुन्हा प्रश्नांच्या फैरी

Last Updated:

अशोक खरात याला न्यायालयाने तीन वेळा पोलीस कोठडी दिली होती. आज चौथ्यांदा त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी, नाशिक : नाशिकचा भोंदूबाबा अशोख खरात याला एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर, दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला तांत्रिकदृष्ट्या अटक दाखवून चौकशीसाठी ताब्यात घेतले. विशेष पोलीस पथकाने खरात याला दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी नाशिक न्यायालयाकडे अर्ज केला होता. न्यायालयाने अर्ज मंजूर केल्यानंतर विशेष पोलीस पथकाने कारागृहात जाऊन खरात याला ताब्यात घेतले.
अशोक खरात
अशोक खरात
advertisement

अशोक खरात याला न्यायालयाने तीन वेळा पोलीस कोठडी दिली होती. आज चौथ्यांदा त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकून त्याला १४ दिवसांची न्यायालयीन

कोठडी सुनावली. त्यानंतर विशेष पोलीस पथकाने दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात न्यायालयाकडे अर्ज केला. पोलिसांनी खरातल्या ताबा घेतल्यानंतर त्याच्यावर पुन्हा प्रश्नांची सरबत्ती होण्याची शक्यता आहे.

अशोक खरात दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यात

advertisement

अशोक खरात याला उद्या ताब्यात घेणार अशी चर्चा सुरू असताना अशोक खरात याला आजच विशेष पोलीस पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. दुपारी पावणे तीनच्या सुमारास खरात याला कारागृहातून ताब्यात घेण्यात आले.

पोलीस कोठडी वाढवून मागितली पण न्यायालयीन कोठडी मिळाली

अशोक खरातविरोधात आतापर्यंत ११ पीडितांनी तक्रार दाखल केली आहे. अशोक खरात विरोधात लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि इतरही अनेक कारनाम्यांची जंत्री वाढतच चालली आहे. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाला अधिक कालावधीची गरज असल्याचा सरकारी पक्षाने युक्तिवाद केला. मात्र न्यायालयाने खरातला १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली.

advertisement

खरातची अख्खी कुंडली पोलिसांच्या हाती

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Agriculture Tips: शेतीला कीड-रोगांचा धोका, उन्हाळ्यात कशी घ्यावी काळजी? पाहा कृषी तज्ज्ञांचा सल्ला, Video
सर्व पहा

नाशिकच्या विकृत भोंदूच्या काळ्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरून गेलाय. बड्या बड्या नेत्यांचा गुरु असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या अनेक कारनाम्यांचा भांडाफोड होतोय. लोकांची कुंडली सांगणाऱ्या कॅप्टन खरात याच्या काळ्या कारनाम्यांची अख्खी कुंडलीच पोलिसांच्या हाती लागली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अशोक खरात दुसऱ्या गुन्ह्यात SIT च्या ताब्यात, जेलमधून ताबा घेतला, पुन्हा प्रश्नांच्या फैरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल