कुंभमेळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कामाची व्याप्ती वाढली जाणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त मनुष्यबळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कुंभमेळ्याच्या वेगवेगळ्या कामांमध्ये 30 हून अधिक विभाग जोडले जाणार आहेत. या विभागांतील रिक्त जागा विहित पद्धतीनुसार (Prescribed Method) भरण्याची सूचना करण्यात आली आहे.
बंजारा समाजाची नवरात्रीमध्ये आगळी- वेगळी परंपरा, अनोख्या पद्धतीने केली जाते पूजा
advertisement
नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि नाशिक जिल्ह्याचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या नोकरी संदर्भातील आदेश सर्व विभागांना दिले आहेत. नाशिक- त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यासाठी वेगवेगळ्या विभागांकडून कामाचे नियोजन सुरू आहे. कुंभमेळ्याच्या काळामध्ये कामासाठी अतिरिक्त मनुष्यबळ लागणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्यासंबंधित असलेल्या विभाग आणि यंत्रणांनी आपापल्या रिक्त जागा भरण्यासाठी सुरूवात करावी, अशी सूचना डॉ. गेडाम यांनी दिल्या. ज्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत रिक्त जागा भरण्याचे अधिकार आहेत, त्यांनी ते पदे योग्य पद्धतीने पालन करून भरावेत, असे आयुक्तांनी सांगितले.
मुंबई मोनोरेलसाठी खास ‘ग्रीस ट्रीटमेंट’; कोट्यवधीचा खर्च मंजूर...
रिक्त जागा भरण्यासाठी जर जास्त वेळ खर्च होणार असेल अथवा हे शक्य नसल्यास, आपल्याकडे पुरेसे मनुष्यबळ सक्षम नसल्याची खात्री झाल्यास त्याबाबतची माहिती, आवश्यक मनुष्यबळाची मागणी आणि कार्यालयीन प्रमुखाच्या प्रतिक्रियेसोबत कुंभमेळा प्राधिकरणास सादर करावी असे सुद्धा सांगण्यात आले आहे. नाशिक विभागातील कोणतेही शासकीय विभाग, अभिकरण, स्थानिक प्राधिकरण, शासकीय कंपनी, संविधानिक मंडळ, महामंडळासह सर्व प्राधिकरणांकडील मनुष्यबळ पूर्णवेळ अथवा अर्धवेळासाठी त्यांचा वापर करण्याचे अधिकार आहेत. शिवाय, नाशिक विभागाबाहेरील मनुष्यबळ शासनाच्या पूर्वपरवानगीने वापरण्याचे अधिकार अध्यक्षांना आहेत.
देवींच्या साडेतीन शक्तिपीठांचे घ्या दर्शन, दादरमधील मंडळाने साकारला अनोखा देखावा
मनुष्यबळाची कमतरता भासल्यास वेळीच प्रस्ताव सादर करावा. कुंभमेळ्याच्या कामात मनुष्यबळाची कमतरता हे विलंबाचे कारण ग्राह्य धरले जाणार नसल्याचे आदेश प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गेडाम यांनी दिले आहेत. कुंभमेळ्याच्या कामांच्या नियोजनासाठी प्राधिकरणाने रिक्त जागा भरण्याची सूचना केली आहे. यामध्ये नाशिक महानगरपालिका, नाशिक शहर व ग्रामीण पोलीस, नाशिक जिल्हा परिषद, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, देवळाली कटक मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग (नाशिक व अहिल्यानगर), भारतीय राज्यमार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महावितरण, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, आरोग्य सेवा, नाशिक पाटबंधारे विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, अन्न व औषध विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, पर्यटन विभाग, महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग, त्र्यंबकेश्वर नगरपालिका, जिल्हा आरोग्य अधिकारी (जिल्हा परिषद), अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासह ३० आणि या व्यतिरिक्त ज्या विभागांमार्फत कुंभमेळ्यासंबंधित कामे केली जातील, अशा सर्व विभागांचा समावेश आहे.