Mumbai Monorail : मुंबई मोनोरेलसाठी खास ‘ग्रीस ट्रीटमेंट’; कोट्यवधीचा खर्च मंजूर, ६२० किलो ग्रीस आणि ३४८० लिटर ल्युब्रिकंटची खरेदी

Last Updated:

मोनोरेल मध्ये सातत्याने होणार्‍या बिघाडामुळे स्थगित करण्यात आलेल्या सर्वसमावेशक दुरुस्तीची तयारी एमएमआरडीएने केली आहे. मोनोरेलच्या दुरूस्तीसाठी एमएमआरडीएकडून इंजिन ऑइलची खरेदी केली जाणार आहे.

मुंबई मोनोरेलसाठी खास ‘ग्रीस ट्रीटमेंट’;  कोट्यवधीचा खर्च मंजूर, ६२० किलो ग्रीस आणि ३४८० लिटर ल्युब्रिकंटची खरेदी
मुंबई मोनोरेलसाठी खास ‘ग्रीस ट्रीटमेंट’; कोट्यवधीचा खर्च मंजूर, ६२० किलो ग्रीस आणि ३४८० लिटर ल्युब्रिकंटची खरेदी
तांत्रिक बिघाड आणि कमी प्रवासी संख्या या कारणांमुळे अनिश्चित काळासाठी मोनेरेल बंद करण्यात आली. यामुळे त्या मोनो रेल्वे स्थानकांदरम्यानच्या सततच्या कमी प्रवाशांच्या संख्येमुळे एमएमआरडीएला सातत्याने तोटा सहन करावा लागत असल्यामुळे बंद करण्यात आली. याशिवाय, मोनोमध्ये सातत्याने होणार्‍या बिघाडामुळे स्थगित करण्यात आलेल्या मोनोरेलच्या सर्वसमावेशक दुरुस्तीची तयारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केली आहे. मोनोरेलच्या दुरूस्तीसाठी एमएमआरडीएकडून 620 किलो ग्रीस आणि 3580 लिटर लुब्रिकंट (इंजिन ऑइल) खरेदी केले जाणार आहे.
अलीकडेच, एमएमआरडीएने अनिश्चित काळासाठी चेंबूर ते संत गाडगे महाराज चौकादरम्यान मोनोरेल मार्गिकेवरील सेवा बंद करण्यात आली होती. ही मोनो सेवा बंद करण्यात आल्यानंतर एमएमआरडीएने नवीन आठ मोनोरेल गाड्यांच्या चाचण्यांना शनिवारपासून अखेर सुरुवात केली आहे. यासोबतच जुन्या पाच मोनो रेल्वेलाही अत्याधुनिक करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या काळात अत्याधुनिक मोनोरेल प्रकल्पाद्वारे प्रवाशांना सुरक्षित सेवा पुरवली जाईल, असा दावा एमएमआरडीएकडून करण्यात आला आहे. तब्बल 580 कोटी रूपये खर्च करून आत्याधुनिक मोनो रेल्वे खरेदी केल्याने जुन्या यंत्रणेशी त्याची एकीकरण होत नव्हती.
advertisement
या पार्श्वभूमीवर चेंबूर- वडाळा- सात रस्ता अशी धावणारी मोनोरेल सेवा 20 सप्टेंबरपासून स्थगित करण्यात आली आहे. या काळात नवीन गाड्यांच्या आधुनिकीकरणासह मार्गिकेसोबत एकरूप केले जाणार आहे. त्याचवेळी जुन्या मोनोरेल्वेच्या दुरूस्तीचे कामे एमएमआरडीएने प्राधान्याने हाती घेतले आहेत. मोनोरेल्वेच्या तेल पाण्यासाठी लागणार्‍या वेगवेगळ्या प्रकारच्या सामग्री खरेदीची निविदा काढण्यात आली आहे. यामध्ये सहा प्रकारचे वेगवेगळे 32 ग्रीस वंगणासाठी खरेदी केले जाणार आहे. तर, रेल्वेच्या इंजिनांला गती मिळण्यासाठी दहा प्रकारचे 3580 लिटर लुब्रिकंट खरेदी केले जाणार आहे.
advertisement
सतत बंद पडणाऱ्या या मोनोला एमएमआरडीएकडून दुरूस्त केले जाणार आहे. अद्याप तरीही चेंबूर ते संत गाडगे महाराज चौकादरम्यानची मोनो रेल केव्हापर्यंत सुरू होणार याची माहिती मिळालेली नाही. मोनोरेलचे इंजिन थंड ठेवणारे दोन हजार लिटर 'कूलंट'ही खरेदी केले जाणार आहे. गाडी बंद पडल्यानंतर बॅटरी बॅकअपही अल्पकाळ टिकत असल्याचे निरिक्षणातून स्पष्ट झाले आहे. यामुळेच गाड्यांच्या बॅटऱ्या सक्षम करण्यासाठी 1 हजार लिटर डिस्टील्ड वॉटर (रासायनिक पाणी) प्राधिकरण खरेदी करणार आहे. ही मार्गिका एमएमआरडीएच्या महामुंबई मेट्रो ऑपरेशन कंपनी लिमिटेडकडून (एमचीओसीडब्ल्यू) चालविली जाते. याच कंपनीअंतर्गत ही खरेदी होणार असून संबंधित कंत्राटदाराला ही सामग्री पुरवायची आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Monorail : मुंबई मोनोरेलसाठी खास ‘ग्रीस ट्रीटमेंट’; कोट्यवधीचा खर्च मंजूर, ६२० किलो ग्रीस आणि ३४८० लिटर ल्युब्रिकंटची खरेदी
Next Article
advertisement
OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
    View All
    advertisement