एका अपंग तरुणाने उभारले स्वप्नांचे साम्राज्य, मातीला जीव देणाऱ्या संजयच्या हातांनी लिहिली जिद्दीची अमर कहाणी

Last Updated:

कल्याण मधील टिटवाळा परिसरात राहणारे संजय गायकर या तरुणाने २००२ साली पाच मूर्तींवर व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय आज त्याच व्यवसायाचे रूपांतर हजारो मूर्ती बनविण्यासाठी झाला आहे.विशेष म्हणजे पायाने अपंगत्व प्राप्त झालेल्या या तरुणाने स्वतःच्या बळावर न खचता उभे राहून अनेक प्रकारच्या मूर्ती ,मडकी,तसेच मातीच्या छोट्या मोठ्या वस्तू बनविण्याचा कारखाना सुरू केला.

+
कल्याण

कल्याण मधील टिटवाळा परिसरात राहणारे संजय गायकर या तरुणाचा व्यवसायामधील प्रवास

कल्याण मधील टिटवाळा परिसरात राहणारे संजय गायकर या तरुणाने 2002 साली पाच मूर्ती केला हा व्यवसाय आज त्याच व्यवसायाचे रूपांतर हजारो मूर्ती बनविण्यासाठी झाला आहे.विशेष म्हणजे पायाने अपंगत्व प्राप्त झालेल्या या तरुणाने स्वतःच्या बळावर न खचता उभे राहून अनेक प्रकारच्या मुर्त्या, मडकी तसेच मातीच्या छोट्या मोठ्या वस्तू बनविण्याचा कारखाना सुरू केला.या व्यावसायिकाने बनविलेल्या मूर्ती मुंबई, लालबाग, ठाणे, अंधेरी, नाशिक, कल्याण तसेच जुन्नर पर्यंत विक्रीसाठी जातात. अशा या तरुणाचा व्यवसायामधील प्रवास जाणून घेऊ यात.
कल्याण मधील टिटवाळा परिसरात राहणारे संजय गायकर एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झालेल्या या तरुणाने सुप्रसिद्ध मूर्तिकार मनोज गोडांबे यांच्या मार्गदर्शनाखाली 2002 साली पाच मूर्तीवर सुरू केलेला हा व्यवसाय आज त्याच व्यवसायाचे रूपांतर हजारो मूर्ती बनविण्यासाठी झाला आहे.विशेष म्हणजे पायाने वयाच्या सातव्या वर्षी पोलिओ ची लागण होऊन अपंगत्व प्राप्त झालेल्या या तरुणाने स्वतःच्या बळावर न खचता उभे राहून अनेक प्रकारच्या मूर्ती ,मडकी,तसेच मातीच्या छोट्या मोठ्या वस्तू बनविण्याचा कारखाना सुरू केला. दरवर्षी या मूर्तिकार 2000 ते 2500 मूर्ती बनवून विक्रीसाठी पाठवत असतो.
advertisement
संजय गायकर यांनी सांगितले की, "मी व्यवसाय सुरू केला हा नफा मिळावा म्हणून नाही तर माझ्या परिसरातील लोक मूर्ती आणण्यासाठी काही मैलावर जात होते. परंतु आता मात्र लोकांना जवळच हवी तशी मूर्ती बनवून भेटत असल्याने दिलासा मिळाला आहे. तसेच गरजू बेरोजगार लोकांना या काळात पैसा मिळवण्याचा साधन ही संजय गायकर यांनी मिळवून दिला. आजच्या घडीला १०ते१५ कुशल कारागीर काम करून आपला उदरनिर्वाह करतात तसेच संजय गायकर यांचं कुटुंब ही या व्यवसायात खुश असल्याचे दिसून येते. त्यांनी बनवलेल्या मूर्ती लालबाग , मुंबई,ठाणे,अंधेरी, नाशिक, कल्याण तसेच जुन्नर या ठिकाणी विक्री साठी जात आहेत.विशेष म्हणजे पायाने अपंगत्व असलेल्या या तरुणाने स्वतःच्या बळावर स्वतःमध्ये कमतरता न शोधता.मी सर्वकाही करू शकतो हा निश्चय करून मूर्तिकारखान्यात यशस्वी झाल्याचे चित्र पूर्ण परिसरात दिसून येत आहे.यांचाच आदर्श आजची तरुण पिढी आर्थिक ,सामाजिक मानसिक परिस्थितीचा सामना करणारी घेऊ शकते.आणि आज टिटवाळा परिसरात आदर्श मूर्तिकार म्हणून प्रसिद्ध आहे.या मूर्तिकाराची वर्षाच्या पूर्ण दिवस विविध प्रकारच्या वस्तू मूर्ती बनविण्यासाठी जात असतो.."
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एका अपंग तरुणाने उभारले स्वप्नांचे साम्राज्य, मातीला जीव देणाऱ्या संजयच्या हातांनी लिहिली जिद्दीची अमर कहाणी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement