तरुणाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या
नाशिकच्या देवळाली गावात 15 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं आहे. विद्यार्थीनी शाळेत जाताना येताना तरुणाकडून सातत्याने छेडछाड केली जात होती. तब्बल दीड ते दोन वर्षे हा छेडछाडीचा प्रकार सुरू होता. लग्न न केल्यास कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी तरुणाने पीडित मुलीला दिली होती. तरुणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने अखेर आपलं जीवन संपवलं. विषारी औषध सेवन करून मुलीने आत्महत्या केली. विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात 10 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीला घेऊन जाताना संबंधित व्यक्तीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या व्हिडीओच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.
advertisement