नाशिक : नाशिक हे पारंपारिक आणि आधुनिक शहर बनत चालले आहे. नाशिकमधील खाद्य संस्कृतीही आता विशेष ओळख तयार करत आहे. याठिकाणी नवनवीन खाद्य पदार्थ रोजच बघायला मिळत असतात. परंतु आता याठिकाणी नाशिककरांसाठी एक अनोख्या संकल्पनेतून जेलच्या रूपातील देखाव्याचे देखील हॉटेल साकारण्यात आले आहे.
कुठलाही गुन्हा न करता आता नाशिककर जेलमध्ये बसून जेवणाचा उत्तम असा अनुभव घेऊ शकणार आहे. ही नवीन संकल्पना नाशिक येथील हॉटेलचालक प्राध्यापक संतोष निकम यांना सुचली आणि या कल्पनेचे त्यांनी सत्यात रुपांतर केले.
advertisement
संतोष निकम हे प्राध्यापक असून एमटेक कॉम्पुटरमध्ये यानी आपले शिक्षण घेतला आहे. ते एका महाविद्यालयाची नोकरी सोडून हॉटेल व्यवसाय या क्षेत्रात आले. ही संकल्पना महाराष्ट्रात पहिल्यांदा त्यांनी आणली, असे ते सांगतात.
पुण्यात रिक्षाचालकांसाठी राबवली जातेय एक विशेष योजना, प्रवाशांनाही होणार विशेष फायदा!
काय आहेत हॉटेलची वैशिष्टे -
या हॉटेलचे वैशिष्ट्य असे की, चक्क हातात बेड्या घालून ते आपल्या ग्राहकांचे स्वागत करतात. या हॉटेलचा संपूर्ण परिसर हा सेंट्रल जेलसारखा हुबेहूब बनविला आहे. यात तुरुंगात जशा खोल्या असतात आणि त्याला खोली क्रमांक दिला असतो, अगदी त्याच पद्धतीने हॉटेलचा देखावा यांनी बनविला आहे.
27 खोल्यांचे म्हणजेच जेवणासाठीचे तुरुंग बनविले आहेत आणि फॅमेलीसाठी तसेच लहान मुलांना काहीतरी नवीन आणि जेलमध्ये काय असते हे थोडक्यात दाखविण्याचा प्रयत्न इथे केला गेला आहे. इतकेच नाही तर या ठिकाणी मांसाहारी आणि शाकाहारी अशा दोन्ही प्रकारचे जेवण उत्तम पद्धतीने मिळते.
शाळेची मैत्री टिकणं अवघड, 3 मैत्रिणींनी स्वप्न टिकवलं; आज तिघीही व्यावसायिक
हॉटेलच्या आतच न्यायालयाचा देखावाही उभारण्यात आला आहे. न्यायालयाचा संपूर्ण अनुभव आणि न्यायाधीशांच्या भूमिकेतील सेल्फी पॉईंट लक्ष वेधून घेत आहे. हा नवीन देखावा नाशिक मध्ये पहिल्यांदाच वॉटर फिल्टर रोडवर दिसून येत आहे. तुम्हालाही हा अनुभव अनुभवायचा असेल तर तुम्हीही याठिकाणी एकदा नक्की भेट देऊ शकतात.