पुण्यात रिक्षाचालकांसाठी राबवली जातेय एक विशेष योजना, प्रवाशांनाही होणार विशेष फायदा!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
‘बघतोय रिक्षावाला फोरम’चे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी याबाबत माहिती दिली. ही प्रीपेड योजना कशी काम करणार आहे, याचविषयी आपण आज जाणून घेऊयात.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : पुण्यात प्रीपेड रिक्षा बूथ या अनोख्या संकल्पनेने पुण्यातील रिक्षा चालकांसाठी एक विशेष योजना राबवली जात आहे. या प्रीपेड रिक्षा बूथद्वारे पुणे रेल्वे स्थानकावरील येणाऱ्या नागरिकांना या योजनेचा फायदा होणार आहे. यामुळे रिक्षाचालकांकडून जास्तीचे दर आकारले जाणार नाही व योग्य दरात प्रवाशांना आपल्या स्थानकापर्यंत पोहोचवण्यासाठी या योजनेची सुरू करण्यात आली आहे. ही प्रीपेड योजना कशी काम करणार आहे, याचविषयी आपण आज जाणून घेऊयात.
advertisement
‘बघतोय रिक्षावाला फोरम’चे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, जास्तीचे भाडे आकारले जाते म्हणून प्रवाशांच्या वारंवार तक्रारी येत होत्या. यामुळे प्रवाशांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी योग्य दरात आपला प्रवास व्हावा, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी महिलांचा प्रवास सुरक्षित होणार आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही ती ट्रिप पाहू शकता.
advertisement
पुणे स्टेशनला जे कोणी रिक्षा चालक येतील त्यांना मीटरप्रमाणे तर त्याचप्रमाणे जे प्रवासी आहेत त्यांनादेखील योग्य दरात प्रवास करता यायला हवा यासाठी हे प्रीपेड रिक्षा बूथ सुरू करण्यात आले आहे. आधुनिक सोईसुविधाच्या माध्यमातून ट्रिप ट्रॅक करता येईल.
advertisement
रिक्षा चालकांनी इथे येऊन नोंदणी करायची आहे. तर प्रवाशांनी या बूथ वर येऊन नाव, नंबर आणि कुठे जायचे आहे याबद्दल माहिती द्यावी त्यानंतर एक स्लिप दिली जाईल, यामध्ये त्यांच्या किती भाडे आहे ते दिले जाईल. त्याचप्रमाणे त्यांना एक क्यूआर कोड दिला जाईल, यामध्ये स्कॅन केल्यानंतर सगळी माहिती दिसेल ती घरच्यांना देखील शेअर करू शकता. यामुळे नागरिकांना सुरक्षित वाटेल.
advertisement
ही सुविधा 24 तास सुरू असणार आहे. तसेच आता पुणे स्टेशन इथे हे सुरू करण्यात आले आहे. येत्या काही काळात वर्दळीच्या असलेल्या ठिकाणी म्हणजेच स्वारगेट, एअरपोर्ट या ठिकाणी देखील सुरू करणार असल्याची माहिती ‘बघतोय रिक्षावाला फोरम’चे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिली.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 30, 2024 12:52 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात रिक्षाचालकांसाठी राबवली जातेय एक विशेष योजना, प्रवाशांनाही होणार विशेष फायदा!