शैलजा, चंद्रशेखर आणि त्यांची मुलगी उमा पवार यांनी त्यांच्या घरातील पाळीव कुत्र्याच्या गरजा समजून घेत हा नवीन उपक्रम इतर पाल्यांसाठी खुला केला आहे. उमा पवार यांना घरात श्वान पाळण्याची आवड आहे. एक वेळेस त्यांना काही कारणास्तव बाहेर गावी जाण्याची गरज पडली त्या वेळी त्यांच्या या श्वानाला कुठे ठेवावे असा प्रश्न पडल्यानंतर आपण काही तरी यांच्यासाठी कराव का? आपल्याला आलेली अडचण अनेक पेट्स पॅरेंट्सना येत असणार या करता घरात ही संकल्पना सांगितल्यानंतर सर्वांनी या विचाराचे समर्थन केले असता त्यांनी त्यांच्या पिंपळगाव बहुला या भागात डॉग पार्क उघडले असल्याचे शैलजा पवार यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
घरात पोपट पाळताय? तर सावधान! कायद्याने 'हा' आहे गुन्हा; होऊ शकते 3 वर्षांची जेल आणि 25000 दंड!
काय आहे पार्कचे वैशिष्ट्ये?
यांच्या डॉग पार्क मध्ये कुत्र्यांना खेळण्यासाठी प्रशस्त असे ग्रिन लॉन आहे. तसेच त्यांना मोकळेपणाने खेळता यावे या करता मोकळी जागा देखील आहे. त्याच बरोबर घसरगुंडी, कुत्र्यांना उंचावरून वाटणारी भीती घालवण्यासाठी वेगवेगळे खेळणी, त्यांच्यासाठी स्पेशल स्विमिंग पूल, असे बरेचशे खेळणी यांनी त्यांच्या या डॉग पार्कमध्ये ठेवल्या आहेत.
तसेच तुम्हाला कुठे बाहेर जाण्याची वेळ आली आणि तुम्ही तुमच्या पेट्सना कुठे ठेवू या विचारात असाल तर या प्रश्नावर देखील यांनी तोडगा काढून कुत्र्यांसाठी हॉस्टेल देखील बनविले आहे. आपण आपल्या पेट्सना यांच्या या हॉस्टेलमध्ये ठेऊन आपले काम करून येऊ शकता. यांच्या या आगळ्यावेगळ्या संकल्पनेमुळे अनेक पेट्स पॅरेंट्स यांच्यामुळे टेन्शन फ्री झाल्याचे दिसत आहे.
कुठे आहे डॉग पार्क?
तुम्ही तुमच्या कुत्र्यांना आणि कुठल्याही पाळीव प्राण्यांना यांच्या या पार्कमध्ये घेऊन जाण्यास इच्छुक असतील तर हे डॉग पार्क नाशिक येथील सातपूर पासून पाच किलोमीटर वर असलेल्या पिंपळगाव बहुला या गावापासून वसडीया गावात सेंट थॉमस शाळेच्या बाजूला यांचे हे डॉग फार्म आहे.





