आता हिना नाशिकमध्ये तब्बल 7 ते 8 प्रकारचे विविध स्किल क्लासेस सुद्धा घेत असतात आणि या माध्यमातून त्या स्वतः देखील रोजगार मिळवत आहेत आणि इतरांना देखील देत असल्याचे त्यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
लहानपणीच वडिलांचा हात डोक्यावरून जाणे हाच खूप मोठा धक्का असतो आणि हेच सर्व हिना यांनी देखील सहन केले. वडील गेल्यानंतर काकांनी सांभाळ केला, परंतु शिक्षण आणि लहान बहिणीची संपूर्ण जबाबदारी आईवर पडली. घरातील मोठी असल्याने आपणच आईला मदत करू याकरता शाळा शिकत असताना हिना या छोट्या-मोठ्या मेहंदीच्या ऑर्डर घेऊ लागल्या. 200 रुपयात सुरुवात केलेल्या या क्षेत्रात कमी वयातच चांगली ओळख हिना यांना मिळाली.
advertisement
हातात राहील पैसा, आंतरपीक पद्धती कशी फायदेशीर? प्रयोगशील शेतकऱ्याने सांगितला अनुभव, Video
बाहेरचे काम करत त्यांनी आपले शिक्षण देखील पूर्ण केले. हळूहळू मेहंदीच्या क्लास, त्यानंतर ड्रॉईंग क्लास, साडीवर डिझाईन बनवणे असे ते इतरांना देखील शिकवू लागल्या. त्याचबरोबर स्वतःचे एम.ए पूर्ण करून आयटीआय डिप्लोमा देखील त्यांनी केला आणि गेल्या 10 वर्षांपासून त्या नाशिकमधील एका शाळेत शिक्षिका देखील आहेत.
आज हिना या मेहंदी क्लासेस, आरिवर्क क्लासेस, पेंटिंग क्लासेस, रेजिन क्लासेस, केक क्लासेस, कॅलिग्राफी क्लासेस घेत असतात. त्याचबरोबर त्या केक देखील बनवून विक्री करत असतात. त्याचबरोबर शिकवणीसाठी आलेल्या लेडीज देखील त्यांचे प्रोडक्ट यांच्या माध्यमातून विक्री करत असतात. यामधून त्यांना महिन्याकाठी 60 कमाई होते.
तुम्हाला देखील यांचे बनवलेले डिझाइन तसेच केक ऑर्डर करावयाचे असल्यास त्यांच्या हिना आर्टिस्ट टच या इंस्टा तसेच फेसबुक पेजवर तुम्ही नक्की भेट द्या. तसेच कुणाला यांच्याकडून या गोष्टींचा क्लास करायचा असल्यास शफ़ात बंगलो, केरू पाटील नगर, नियर एमसीबी सबस्टेशन, बोराडे मळा, जेल रोड, नासिक रोड या ठिकाणी भेट देऊ शकतात.