विहितगावच्या लक्ष्मणनगरात राहणारे गॅरेज मालक अल्ताफ शेख हे पत्नीसह मुलगा झिदानला घेऊन नातेवाइकांकडे गेले होते. सायंकाळी विहितगावकडे परतताना शेख दुचाकी चालवत असताना, मुलगा पुढे बसलेला होता. अचानक नायलॉन मांजाने झिदानच्या गळ्यावर फास बसला आणि गळा खोलवर चिरून रक्ताची धार काढली. किंचाळत असलेल्या मुलाला पाहून वडिलांनी गाडी थांबवली. नागरिकांची गर्दी जमली आणि तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले.
advertisement
‘तुम्ही माझ्या मुलीसारख्या..,’ जवळ यायचा अन् नको ते करायचा, संभाजीनगरात शिक्षकाचं धक्कादायक कांड
दरम्यान, आई-वडिलांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत असताना, ‘बालंबाल वाचला!’ असा आशावाद जमलेले लोक व्यक्त करत होते. तर नायलॉन मांजाच्या वापराला बंदी असताना देखील तो वापरला जात असून त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याने संताप देखील व्यक्त केला जात आहे.
13 दिवसांत दुसरी भयानक घटना
31 डिसेंबरला द्वारका उड्डाणपुलावर दुचाकीस्वार इसमाचा गळा नायलॉन मांजाने मुख्य रक्तवाहिनीपर्यंत चिरला होता. सुदैवाने तोही वाचला!






