नेमकं काय घडलं ?
आर्मीच्या आर्टीलरी सेंटरचा एक जवान देवळाली परिसरात पॅराशूट उडवण्याचा सराव करत होता. तो हवेत असताना अचानक त्याचं पॅराशूटवरील नियंत्रण सुटलं आणि तो देवळाली परिसरातील एका घरावर कोसळला. अशाप्रकारे भारतीय सैन्याचा जवान पॅराशूटसह घरावर कोसळल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.
या दुर्घटनेची माहिती मिळताच भारतीय सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी आणि जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त जवानाला सुखरुपणे बाहेर काढलं आहे. या घटनेत संबंधित जवान जखमी झाला आहे. तातडीने त्याला देवळाली येथील लष्कराच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
advertisement
पॅराशूट एका घराच्या छतावर कोसळल्यामुळे घराचे मोठे नुकसान झाले आहे. घराचे पत्रे कोसळल्याची माहिती आहे. सुदैवाने, या घटनेत घरात असलेल्या कोणालाही इजा झाली नाही. सध्या जखमी जवानावर उपचार सुरू असून, पॅराशूट कोसळण्यामागचे कारण शोधण्यासाठी लष्करी पातळीवर चौकशी सुरू करण्यात आली आहे.