नाशिक: मानवी जीवनात आणि हिंदू धर्मात देखील गाईंचं महत्त्व मोठं आहे. त्यामुळेच गाईंची गोमाता म्हणून पूजा देखील केली जाते. परंतु, सध्याच्या काळात देशी गाईंचं संगोपन करण्याचं टाळून त्यांची कत्तल होत असल्याचे प्रकार घडत आहेत. गोमातेचं संरक्षण व गोपालनाचं काम नाशिकमधील राजलक्ष्मी गोशाळेचे संस्थापक किरण पाटील हे गेल्या 28 वर्षांपासून करत आहेत. देशी गोवंशाचं महत्त्व आणि त्याची गरज याबाबत पाटील यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
advertisement
गोशाळेतील प्रत्येक छोटे-मोठे काम करणारा सदस्य खूप मोठे ‘सत्कर्म’ करत आहे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी. गोशाळेतील काम करणारे सहकारी, गाईची वेळच्या वेळी धार काढणारा मदतनीस, गाईला चारा-पाणी खाऊ घालणारा कामगार असो किंवा गाईचे दूध, दही, तूप घराघरातून पोहचवणारा दूधवाला असेल, प्रत्येक जण खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, याची दखल घ्यायला हवी. याशिवाय पंचगव्य उत्पादन करणारे उद्योजक आणि त्याची विक्री करणारे व्यावसायिक, हे सर्व फक्त देशी गोवंशाचे संवर्धन करत नाहीत, तर हे गोसेवक राष्ट्र कल्याणासाठी झटत आहेत, असे पाटील सांगतात.
तब्बल 42 तत्त्वांचा खजिना, आता आलीये आयुर्वेदिक पाणीपुरी, नाशिकच्या तरुणाला मिळालं पेटंट
देशी गाईंचं संगोपन गरजेचं
जे देशी गोवंश सांभाळत आहेत, त्यांना नक्कीच माहीत आहे की आपण किती महत्त्वाचे काम करत आहोत. या सर्व गोसेवकांचे काम निरंतर सुरू राहावे आणि त्यांच्या कामाला गती मिळावी यासाठी आनंदाची बाब म्हणजे नुकतीच महाराष्ट्र सरकारने गो-सेवा आयोगाला मान्यता दिली आहे. गोवंश संवर्धनातून खत निर्मिती, विद्युत निर्मिती, बायोगॅस निर्मिती यांसारख्या अनेक योजनांना चालना मिळाल्यास बेरोजगारीची समस्या काही अंशी सुटण्यास मदत होईल, असे पाटील सांगतात.
शेतीसाठी गाईचा फायदा
देशी गाईचे शेण आणि गोमुत्र यांचा शेतीसाठी मोठ लाभ होतो. तसेच गोमुत्र देखील शरीरासाठी चांगले असते. गाईचे अनेक फायदे आहेत. अनेक शुभ कार्यात गोत्र विचारेल जाते. तर गाईचेच मुळ गोत्रात आहे. त्यामुळे सर्वांनी आपर्जून गोपालन व गोसंगोपन करावे. तरीही कुणाला गाय सांभाळणे कठीण असल्यास ती कत्तल खाण्यात न देता राजलक्ष्मी गोशाळेत निशुल्क सांभाळायला देऊ शकता, असे आवाहन किरण पाटील यांनी केलंय.