नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित महिलेची मुलगी आणि संशयित कुणाल वानखेडे यांच्यात प्रेमसंबंध आहेत. पीडित महिला आपल्या मुलीला मारहाण करते, असा राग कुणालच्या मनात होता. याच रागातून तो मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास आपल्या एका मित्रासह तक्रारदार महिलेच्या घरी पोहोचला. त्याने दरवाजा जोरात ठोठावण्यास सुरुवात केली. महिलेने दरवाजा उघडताच त्याने तिच्या मुलाला बाहेर बोलावण्याची मागणी केली. यावेळी महिलेने त्याला हटकले असता, त्याने आरडाओरडा करत अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सोबत असलेला मित्र त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होता, मात्र मद्याच्या नशेत असलेला कुणाल ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.
advertisement
Shocking News : घरी सुखी संसार असूनही ऑनलाइन प्रेम झालं, कुर्ल्यातील तरुणासोबत नको ते घडलं
कोयत्याचा धाक आणि मुलाला चावा
गोंधळ वाढल्याने महिलेचा भाऊ आणि मुलगा घराबाहेर आले. त्यांनी कुणालला घरी जाण्यास सांगितले, मात्र त्याचा पारा अधिकच चढला. झटापटीदरम्यान कुणालने महिलेच्या मुलाच्या डाव्या हाताचा जोरात चावा घेतला. इतक्यावरच न थांबता, त्याने आपल्या कमरेला लावलेला कोयता उपसून सर्वांना दाखवला. "ती फक्त माझी आहे, यापुढे तिला हात लावला तर तुम्हा सर्वांना टपकवून टाकीन," अशी धमकी त्याने कुटुंबाला दिली.
मध्यरात्री झालेल्या या धिंगाण्यामुळे परिसरातील नागरिक जागे झाले आणि घटनास्थळी जमा झाले. नागरिकांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु संशयिताने त्यांनाही शिवीगाळ करत परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक उपनिरीक्षक एच. आय. शेख या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






