TRENDING:

भाविकांसाठी खूशखबर! सप्तशृंगी मातेचं आता 24 तास दर्शन, त्र्यंबकेश्वर मंदिराचाही मोठा निर्णय

Last Updated:

Nashik News: नाताळ आणि वर्षअखेरच्या सुट्टयांत नाशिकमधील सप्तशृंगी गड आणि त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक : नाताळच्या सुट्ट्या, शाकंभरी नवरात्रोत्सव आणि सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिक जिल्ह्यातील शक्तिपीठ आणि ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे. ही तुडुंब गर्दी लक्षात घेता, प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठे बदल केले आहेत. त्यामुळे भाविकांना दिलासा मिळणार आहे.
भाविकांसाठी खूशखबर! सप्तशृंगी मातेचं आता 24 तास दर्शन, त्र्यंबकेश्वर मंदिराचाही मोठा निर्णय
भाविकांसाठी खूशखबर! सप्तशृंगी मातेचं आता 24 तास दर्शन, त्र्यंबकेश्वर मंदिराचाही मोठा निर्णय
advertisement

सप्तश्रृंग गडावर आता 'अहोरात्र' दर्शन

कळवण तालुक्यातील श्रीक्षेत्र सप्तश्रृंगगड येथे दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना सुलभ आणि समाधानकारक दर्शन मिळावे, यासाठी देवस्थान प्रशासनाने मंदिर 24 तास खुले ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तर मंगळवार, 30 डिसेंबर 2025 ते रविवार, 4 जानेवारी 2026. या पाच दिवसांच्या काळात मंदिर दर्शनासाठी एक क्षणही बंद होणार नाही, ज्यामुळे भाविकांना गर्दीच्या त्रासाशिवाय दर्शन घेता येईल.

advertisement

ध्यानस्त बसणं पडणं महागात, डोळे उघडल्यावर पश्चातापाची वेळ, ठाण्यातील मठात काय घडलं?

त्र्यंबकेश्वर मंदिरात पहाटेपासूनच 'हर हर महादेव'

दक्षिण गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरीच्या तटी, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी मंदिर प्रशासनाने द्वार उघडण्याची वेळ एक तास अलीकडे आणली आहे.

नवीन वेळ: आता मंदिर पहाटे 5 ऐवजी पहाटे 4 वाजता उघडणार आहे. पहाटेची वेळ वाढवल्यामुळे सकाळी होणारी भाविकांची गर्दी विभागली जाईल आणि अधिक भाविकांना दर्शन घेता येईल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाढला सोयाबीनचा भाव, तूर आणि कापसाची स्थिती काय?
सर्व पहा

गर्दीच्या काळात शांतता राखावी, रांगेत उभे राहून शिस्तीचे पालन करावे आणि मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरून सर्वांनाच आदिशक्ती आणि महादेवाचे दर्शन सुखकर होईल, असे आवाहन भाविकांना केले जात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
भाविकांसाठी खूशखबर! सप्तशृंगी मातेचं आता 24 तास दर्शन, त्र्यंबकेश्वर मंदिराचाही मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल