असे राहणार दुरुस्तीचे स्वरूप आणि वेळ
- कामाची सुरुवात: रविवार, सकाळी 11 वाजेपासून.
- कालावधी: दुरुस्तीसाठी किमान 8 ते 10 तास लागण्याची शक्यता.
- प्रभावित क्षेत्र: सातपूर, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, पंचवटी आणि सिडको या पाचही मुख्य विभागांचा पाणीपुरवठा खंडित असेल.
Weather Alret : महाराष्ट्रात वारं फिरलं, 'तो' परत आलाय शनिवारी धुमाकूळ घालणार, हवामान खात्याचा अलर्ट
advertisement
सोमवारीही पाणी कपात
रविवारी दिवसभर दुरुस्ती चालणार असल्याने सोमवारी (दि. 5) सकाळी होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरही याचा परिणाम होईल. सोमवारी शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
"जलवाहिनीची गळती मोठी असल्याने तातडीने काम करणे अनिवार्य आहे. नागरिकांनी उपलब्ध पाणी साठा जपून वापरावा आणि महापालिकेला सहकार्य करावे." रविवारी दुपारचा आणि संध्याकाळचा पुरवठा पूर्णपणे बंद असेल, तरी नागरिकांनी आजच पाण्याचा साठा करून ठेवणे हिताचे ठरेल. असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग, मनपा यांनी केले आहे.
advertisement
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 03, 2026 8:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: नाशिककर पाणी जपून वापरा, संपूर्ण शहराचा पुरवठा बंद राहणार, कधी आणि का?






