'संकटमोचक' सापडले संकटात,भाजपसमोर मोठं आव्हान, नाशिकमध्ये माजी महापौरांसह किती उमेदवारांनी केली बंडखोरी?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Nashik Election 2025 : महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला बंडखोरीचे ग्रहण लागलं आहे. उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारांसमोर बंडखोर उमेदवार उभे राहिले आहेत. यामुळे भाजपची मोठी अडचण झाली आहे.
नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला बंडखोरीचे ग्रहण लागलं आहे. उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारांसमोर बंडखोर उमेदवार उभे राहिले आहेत. यामुळे भाजपची मोठी अडचण झाली आहे.
भाजपमध्ये एकूण १० बंडखोर असून ते ताकदीचे आहेत. नाशिक जिल्हा पक्षाचे सरचिटणीस अमित घुगे यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे अरुण पवार यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे. दुसरी कडे माजी महापौर अशोक मूर्तडक यांनी गुरुमित बग्गा यांच्या विरोधात बंडघोरी केली आहे.
advertisement
या बंडखोरीमुळे भाजपच्या १०० प्लसच्या नाऱ्याला मोठा धक्का बसणार आहे. बडखोरांना थंबवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन गेले २ दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून बसले आहेत. मात्र गिरीश महाजन बंडखोरी थांबवण्यात अपयशी ठरले आहेत.
भाजप अधिकृत उमेदवार विरुद्ध बंडखोर उमेदवार यादी
advertisement
प्रभाग क्र. १) अरुण पवार (भाजप) विरुद्ध अमित घुगे (बंडखोर)
प्रभाग क्र. २ ) मच्छिंद्र सानप (भाजप) विरुद्ध रुची कुंभारकर (बंडखोर)
प्रभाग क्र. ६) गुरुमित बग्गा (भाजप) विरुद्ध अशोक मूर्तडक (बंडखोर)
advertisement
प्रभाग क्र. १०) समाधान देवरे (भाजप) विरुद्ध शशिकांत जाधव ( बंडखोर)
प्रभाग क्र. २९) दिलीप दातीर (भाजप) विरुद्ध मुकेश शहाणे (बंडखोर)
प्रभाग क्र. २८) शरद फडोळ (भाजप) विरुद्ध दिलीप दातीर (बंडखोर)
प्रभाग क्र. २०) संभाजी मोरूसकर (भाजप) विरुद्ध अंबादास पगारे (बंडखोर)
advertisement
प्रभाग क्र. १८) ज्योती माळवे (भाजप) विरुद्ध मीरा हांडगे (बंडखोर)
गेल्या चार दिवसांपासून अधिकृत उमेदवारी मिळवण्यासाठी सुरू असलेली रस्सीखेच, राजकीय डावपेच, आरोप-प्रत्यारोप आणि गदारोळ अखेर शुक्रवारी (दि. २ ) संपुष्टात आला. १२२ जागांसाठी दाखल झालेल्या १,३९५ उमेदवारी अर्जांपैकी शेवटच्या दिवशी तब्बल ६६६ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता ७२९ उमेदवार महापालिका निवडणुकीच्या मैदानात अंतिमरित्या आपले नशीब आजमावणार आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्वाधिक २४६ उमेदवार रिंगणात असून, शिंदेसेना–राष्ट्रवादी (अप) युतीचे १४४ आणि भाजपचे ११८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
advertisement
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 03, 2026 1:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'संकटमोचक' सापडले संकटात,भाजपसमोर मोठं आव्हान, नाशिकमध्ये माजी महापौरांसह किती उमेदवारांनी केली बंडखोरी?









