नाशिक : आज महिला कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. प्रत्येक क्षेत्रात भारतातील महिला या देशाचे नाव मोठे करत आहेत. देशाला गर्व होईल अशी कामगिरी करत आहेत. आज अशाच एका महिला खेळाडूची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. स्नेहल कोकणे असे या खेळाडूचे नाव आहे. शेतकरी कुटुंबातील स्नेहलने आज सर्वांना अभिमान वाटेल, अशी कामगिरी केली आहे. लोकल18 च्या टीमने त्यांच्या कामगिरीची घेतलेला हा आढावा.
advertisement
भारतातील पहिली महिला प्रो कार्डधारक खेळाडू ही नाशिकची आहे. स्नेहल कोकणे असे या खेळाडूचे नाव आहे. स्नेहलने बॉडी बिल्डिंगच्या खेळात आपल्या भारताचे नाव उंचावले आहे. स्नेहल ही नाशिक येथील एका शेतकरी कुटुंबातुन येते. तिने आतापर्यंत अनेक सुवर्णपदके जिंकली असून तिला आतापर्यंत तब्ब्ल 125 नामांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
ती पहिली भारतीय महिला प्रो कार्ड धारक, महिला बॉडी बिल्डर भारत श्री, आशिया श्री, मिस इंडिया, मिस आशिया, मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड, आयएफबीबी या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधत्व करणारी पहिली महिला स्पर्धक तसेच इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे.
शेतकरी कुटुंबातील स्नेहलचा आज जगात डंका वाजत आहे. कुठला प्रश्न मनात न ठेवता तिने या क्षेत्रात येण्याचे ठरविले. खरंतर या क्षेत्रात शरीर बनविण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. त्याचप्रमाणे कुठल्या स्पर्धेसाठी उभे राहायचे म्हटल्यावर अर्धे नग्न कपडे हे आपल्याला अंगावर घालायचे असतात. परंतु तिने कुठलीही पर्वा न करता आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
nashik one day trip : नाशिकमध्ये एका दिवसात पाहता येतील ही 5 ऐतिहासिक मंदिरे
काय म्हणाली स्नेहल कोकणे -
लोकल18 शी बोलताना स्नेहलने सांगितले की, माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात मला माझा कुटुंबाचा आणि विशेष म्हणजे माझ्या पतीचा खंभीर पाठिंबा आहे. महिला कुठल्याही क्षेत्रात आता मागे राहिलेल्या नाहीत, असेही तिने सांगितले.





