TRENDING:

Nashik Water: उन्हाळा सुरू होत नाही तेच नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाई, किती दिवसांनी होणार पाणी पुरवठा?

Last Updated:

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन होत असल्यामुळे पाणी पुरवठा दोन दिवसा आड केला जाणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा उन्हाच्या आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासूनच त्र्यंबकनगरीत पाण्याचा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. गुढीपाडव्यापासून त्र्यंबकशहरामध्ये दोन दिवस आड पाणी पुरवठा केला जाणार आहे. नुकताच उन्हाळा सुरू झाला असून तेच आत्तापासूनच पाण्याचा प्रश्न नागरिकांना भेडसावू लागला आहे. त्र्यंबकेश्वर नगर परिषदेकडून शहराला कशा पद्धतीने पाणी पुरवठा केला जाणार आहे, याची माहिती दिली आहे. शिवाय, कोणत्या वेळी पाणी पुरवठा केला जाणार, याची माहिती सुद्धा दिली आहे.
News18
News18
advertisement

नगर परिषद प्रशासनाने गुढीपाडव्यापासून त्र्यंबक शहराला एक दिवसा आड पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती दिली आहे. शहराला पाणी पुरवठा दोन भागांमध्ये केला जाणार आहे. एका भागाला एक दिवस, दुसऱ्या भागाला दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा केला जाणार आहे. जेव्हा पाणी पुरवठा केला जाणार त्यावेळी फक्त 45 मिनिटेच पाणी मिळणार आहे. 45 मिनिटांमध्ये नागरिकांना दोन दिवस पुरेल इतका पाणी पुरवठा करण्याचे आवाहन केले असून जरा जपून पाणी वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. त्र्यंबक शहरामध्ये सार्वजनिक पाणवठे नाहीत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दादर स्टेशनचा ‘मानवी इंडिकेटर’, 4 वर्षांपासून नरेंद्र करतात अनोखी सेवा, Video पाहून तुम्हीही कराल कौतुक
सर्व पहा

कपडे धुणे आणि वापराचे पाणी भरून आणता येईल, असे पाणीसाठेही नाहीत. त्यामुळे गृहिणींची कुचंबणा होत असते. सधन कुटुंब टँकरचे पाणी विकत घेतात तर, पिण्यासाठी जार वापरतात. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्याची गैरसोय सहन करावी लागत आहे. दरम्यान, वीजपुरवठा खंडित होतो, तेव्हा 48 तासांची मुदत 72 तासांवर सुद्धा जात असल्याची घटना घडते. सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात दररोज 24 तास पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, ते आश्वासन आजपर्यंत केव्हाच पूर्ण झालेले नाही. विधानसभा किंवा नगर परिषदेच्या निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. जाहीर सभेत 24 तास शुद्ध नियमित पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. मात्र, अवघ्या दोन- अडीच महिन्यांत दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Water: उन्हाळा सुरू होत नाही तेच नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाई, किती दिवसांनी होणार पाणी पुरवठा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल