TRENDING:

Who Is Ashok Kharat : कोण आहे अटक झालेला ज्योतिषी अशोक खरात? रूपाली चाकणकरांचं कनेक्शन समोर!

Last Updated:

Who Is Ashok Kharat : कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात छापा मारला अन् आक्षेपार्ह पुरावे हाती लागले आहेत. त्यावेळी कार्यालयात पोलिसांनी जे काही पाहिलं त्यानंतर पायाखालची जमीनच सरकली. पण हा 'स्वघोषित कॅप्टन' आहे कोण? जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Who Is Ashok Kharat (प्रणाली कोद्रे, प्रतिनिधी) : 'कॉस्मोलॉजी' तज्ज्ञ आणि स्वत:ला ज्योतिषी म्हणून घेणाऱ्या एका भामट्या 'स्वघोषित कॅप्टन'ला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. बड्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगणारा ज्योतिषी अशी याची ओळख होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासानंतर धक्कादायक वास्तव समोर आलंय. एका 35 वर्षीय महिलेने बलात्कार केल्याचा आरोप करत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून, खरात याच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात छापा मारला अन् आक्षेपार्ह पुरावे हाती लागले आहेत. त्यावेळी कार्यालयात पोलिसांनी जे काही पाहिलं त्यानंतर पायाखालची जमीनच सरकली. पण हा 'स्वघोषित कॅप्टन' आहे कोण? जाणून घ्या.
Who Is Ashok Kharat Arrest in Abused Case
Who Is Ashok Kharat Arrest in Abused Case
advertisement

कोण आहे अशोक खरात?

नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. नोव्हेंबर 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील मंदिरात भेट दिल्यानंतर अशोक खरात चर्चेत आला होता. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असतात. कॅप्टन अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. 'शिवनिका ट्रस्ट'च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याचे मानले जाते.

advertisement

रुपाली चाकणकर यांचं कनेक्शन काय?

बलात्काराच्या आरोपात अटक केलेला अशोक खरात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा गुरू असल्याचा आरोप केला जातोय. नाशिकमध्ये क्राईम ब्रांचने अटक केलेला बलात्काराचा आरोपी बाबा हा महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा निकटवर्तीय आहे. या भविष्यवेत्या बाबाच्या फोनमधून त्यांच्या भक्तांचे ५० च्या वर अश्लील व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या बाबाने स्थापन केलेल्या संस्थेवर सदस्य सुद्धा आहेत. महिलांचे शोषण करणारा बाबा जर का रूपाली चाकणकर यांचा गुरू असेल तर रूपाली चाकणकर या महिलांचे रक्षण कसं करतील? असा सवाल उपस्थित केलाय शिवेसना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

advertisement

advertisement

कॉस्मोलॉजीमध्ये सुवर्णपदक 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दादर स्टेशनचा ‘मानवी इंडिकेटर’, 4 वर्षांपासून नरेंद्र करतात अनोखी सेवा, Video पाहून तुम्हीही कराल कौतुक
सर्व पहा

दरम्यान, गुरू मुजुमदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक खरात याने शिक्षण घेतले आणि प्रशिक्षणात सुवर्णपदकही मिळवलं होतं, अशी माहिती देखील समोर आली आहे. अशोकने मर्चंट नेव्हीमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी ‘कॉस्मोलॉजी' या विषयाकडे लक्ष केंद्रित केलं अन् महिलांना फसवण्यास सुरूवात केली होती.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Who Is Ashok Kharat : कोण आहे अटक झालेला ज्योतिषी अशोक खरात? रूपाली चाकणकरांचं कनेक्शन समोर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल