नवी मुंबई महापालिकेमध्ये एकूण 28 प्रभागांमध्ये 111 जागांपैकी भाजप 27 आणि शिवसेनाही 27 जागांवर आघाडीवर आहे, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा केवळ एक उमेदवार नवी मुंबईत आघाडीवर आहे. काँग्रेस तसंच राष्ट्रवादीला नवी मुंबईमध्ये अजून खातंही उघडता आलेलं नाहीये.
याआधी गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचं निर्विवाद वर्चस्व होतं. मागच्या महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 52 जागांवर तर शिवसेना 38, काँग्रेस 10, भाजप 6 आणि अपक्ष 6 उमेदवार जिंकले होते.
advertisement
नवी मुंबईमध्ये भाजप-शिवसेना यांच्यात संघर्ष असतानाच तिकडे भाजपमध्येही अंतर्गत वाद आहे. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातील वाद पाहता भाजपने पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रभारी म्हणून पाठवलं होतं. दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव ठाकरे तसंच काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नवी मुंबईमध्ये संघर्ष करताना दिसत आहे.
