TRENDING:

पोलिसाच्या बायकोसोबत लफडं, तरुणाचा रातोरात खेळ खल्लास, 191 किमीवर सापडली बॉडी, महाराष्ट्राला हादरवणारी घटना!

Last Updated:

पोलिसाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या कारणातून एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पोलिसाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या कारणातून एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी पोलिसाने बायकोच्या प्रियकराची हत्या करून त्याचा मृतदेह तब्बल १९१ किलोमीटरवर नेऊन विल्हेवाट लावला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस प्रशासन देखील हादरून गेलं आहे. ही घटना नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी परिसरात घडली.
News18
News18
advertisement

काय नेमकं प्रकरण?

6 फेब्रुवारी रोजी खंडाळा तालुक्यातील सुखेड गावातील एका शेतविहिरीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांचा तपासात धक्कादायक बाब उघडली. मृत तरुण हा नवी मुंबईतील कळंबोली येथील रहिवासी होता. त्याचे रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हवालदार भिसे यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. याच कारणातून हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

advertisement

191 किलोमीटरचा प्रवास

पोलिसांनी हवालदार भिसे यांच्यावर संशय आला. त्यांच्या पत्नीचे मृत व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून हा वाद सुरू झाला होता. भिसे याने मृत तरुणाला भेटायला बोलावले. त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपी हवालदाराने मृतदेह कारमध्ये चालकाच्या शेजारच्या सीटवर बसवला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून मृतदेह जिवंत माणसाप्रमाणे बसवून त्याने नवी मुंबई ते सातारा असा 191 किलोमीटरचा प्रवास केला. लोणंदमधील सुखेड परिसरात पोहोचल्यावर त्याने मृतदेह एका विहिरीत टाकून तो जाळण्याचा प्रयत्न केला.

advertisement

अर्धवट जळालेला मृतदेह…

मात्र, मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत राहिल्याने त्याचा बनाव फसला. स्थानिकांना मृतदेह दिसताच पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतले. लोणंद पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे तांत्रिक तपास केला. आरोपी आणि मृत व्यक्तीचे मोबाईल लोकेशन एकाच मार्गावर आढळले. महामार्गावरील टोल नाके आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीच्या वाहनाचा मागोवा घेतला.

advertisement

आरोपी अटकेत

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गृहिणींनो, रिस्क का घेताय? जेवणाची ‘ही’ चूक पडेल महागात, काहीही होऊ शकतं, Video
सर्व पहा

संशय बळावल्यानंतर नवी मुंबईतून हवालदार भिसे याला ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पोलिसाच्या बायकोसोबत लफडं, तरुणाचा रातोरात खेळ खल्लास, 191 किमीवर सापडली बॉडी, महाराष्ट्राला हादरवणारी घटना!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल