नवी मुंबईत कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असून, आज नवी मुंबईत चार नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता १९ वर पोहोचली आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढताना दिसत आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक असून प्रशासनाकडून देखील दक्षता घेतली जात आहे.
advertisement
JN.1 प्रकार काय आहे?
JN.1 हा प्रत्यक्षात ओमिक्रॉन प्रकाराचा एक उपप्रकार आहे, जो BA.2.86 म्हणजेच पिरोलापासून विकसित झाला आहे. 2023 मध्ये लक्झेंबर्गमध्ये तो पहिल्यांदा ओळखला गेला आणि हळूहळू जगाच्या अनेक भागात पसरला, ज्यामध्ये आता भारताचाही समावेश आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की त्यात काही विशेष बदल झाले आहेत, ज्यामुळे हा प्रकार पूर्वीपेक्षा लोकांमध्ये वेगाने पसरतो.
काय आहेत लक्षणं?
थंडी वाजून ताप येते
कोरडा खोकला
घसा खवखवणे
थकवा
डोकेदुखी
वाहणारे किंवा बंद झालेले नाक
स्नायू दुखणे
श्वास घेण्यास त्रास होणे
साधारण ही लक्षणं 14 दिवस राहतात. आतापर्यंत या आजाराचा एकही गंभीर रुग्ण आढळेला नाही ही सर्वात दिलासा देणारी गोष्ट आहे. पूर्वीच्या प्रकारांमध्ये जास्त ताप, घाम येणे आणि थंडी वाजून येणे सामान्य होते, JN.1 व्हेरिएंटमध्ये ताप हलका येतो, अंग कोमट राहातं, म्हणजेच शरीराचे तापमान 99.6°F ते 100.5°F दरम्यान राहते. त्याच्यासोबत थंडी वाजून येणे किंवा घाम येणे असे काही नसते. हा ताप अनेक दिवस अंगात राहातो थकवा किंवा सामान्य अशक्तपणा समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. ताप सर्दी खोकला झाल्यास तातडीनं डॉक्टरांकडे जावं. शिवाय रोज मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा. ज्यामुळे कोरोनाचा धोका कमी होऊ शकतो.