TRENDING:

'कटस्थान'चा अपभ्रंश होऊन 'कडेठाण' झाला, 'कडेठाण' देवीचा रंजक इतिहास...

Last Updated:

संभाजीनगर जिल्ह्यात देखील अनेक प्राचीन देवीचे मंदिर आहे. त्यापैकीच कडेठाण येथे देखील  देवीचे प्राचीन अशी मंदिर आहे. तर देवीच्या मंदिराचा काय इतिहास आहे हे आपल्याला  सांगितलेला आहे स्थानिक उदयसिंग तवार यांनी.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
‎छत्रपती संभाजीनगर : नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक अशी देवीचे ठाण आहेत. प्रत्येक मंदिराचा आपला असा इतिहास आहे. संभाजीनगर जिल्ह्यात देखील अनेक प्राचीन देवीचे मंदिर आहे. त्यापैकीच कडेठाण येथे देखील  देवीचे प्राचीन अशी मंदिर आहे. तर देवीच्या मंदिराचा काय इतिहास आहे हे आपल्याला  सांगितलेला आहे स्थानिक उदयसिंग तवार यांनी.
advertisement

श्रद्धा- अर्थव्यवस्थेला गती देणारा ‘कुंभ मेळावा’; रोजगार, उत्पन्नात होणार भरभराट

प्राचीन काळी श्री क्षेत्र कटिस्थान या नावाने ओळखले जाणारे हे छोटेसे गावं औरंगाबाद जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या पैठण तालुक्यात वसलेले आहे. पैठण गावच्या पूर्वेस 45 कि. मी. अंतरावर असलेल्या या गावाचे आजचे प्रचलित नाव 'कडेठाण' असे आहे. जुन्या कटिस्थान या नावाचा अपभ्रंश होत होत कडेठाण हे नाव झाले आहे असावे. या गावची लोकसंख्या 4000 च्या जवळपास असून गावात 350- 400 घरांचा उंबरठा आहे. पैठण ते कडेठाण व औरंगाबाद ते कडेठाण अशी कायम स्वरुपी बस सेवा उपलब्ध आहे.

advertisement

बंजारा समाजाची नवरात्रीमध्ये आगळी- वेगळी परंपरा, अनोख्या पद्धतीने केली जाते पूजा

औरंगाबाद बीड राज्य मार्गावरील अडूळ, थापटी तांडा, आडगांव, पाचोड या गावापासून साधारणपणे 10 ते 15 कि. मी. अंतर कापूनच कडेठाणला जावे लागते.‎ या मंदिराचा इतिहास सांगायचं झालं तर ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णांचे लग्न झालं जालना जिल्ह्यातील जामखेड ते जामवंती सोबत झालं त्यावेळेस लक्ष्मीपूजन हे कडेठाण या ठिकाणी झालं. त्यांच्या लक्ष्मीपूजनाच्या प्रित्यर्थ या लक्ष्मीची स्थापना करण्यात आली. भगवान श्रीकृष्णाच्या हस्ते स्थापना झाली आहे. त्यावेळी सर्व 33 कोटी देव आहेत ते सर्व या ठिकाणी जमा झाले होते.

advertisement

मुंबई मोनोरेलसाठी खास ‘ग्रीस ट्रीटमेंट’; कोट्यवधीचा खर्च मंजूर...

त्यामुळेच नाव पहिले कट स्थान होतं आणि नंतर अपभ्रंश होत या गावाचं नाव आहे कडेठाण झाला आहे असं स्थानिकांनी सांगितला आहे. ‎नवरात्रीचे नऊ दिवस या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते त्यासोबतच नऊ दिवस अगदी मनोभावे या ठिकाणी देवीची पूजा आजच्या केली जाते. मंदिरामध्ये अनेक भाविक देखील घट मांडत असतात. त्यासोबतच नवसाला पावणारे देवी म्हणून देखील या देवीची ख्याती आहे. दूरवरून भाविका ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'कटस्थान'चा अपभ्रंश होऊन 'कडेठाण' झाला, 'कडेठाण' देवीचा रंजक इतिहास...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल