विलिनिकरणामुळे नेत्यांना अडचणी
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरण करण्यासाठी एकदा दोनदा नाही तर अनेकवेळा बैठका झाल्याचं समोर आलंय. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात सातत्याने चर्चा होत होत्या. अजित पवार यांनी सुमारे 8 वेळा जयंत पाटील यांच्यासोबत बैठक घेतली अन् आगामी रणनिती कशी असेल, यावर चर्चा केली. यावेळी चार ते पाच बैठकीत अजित पवार फक्त आपल्या भावना व्यक्त करत होते. अजित पवार यांनी पुढाकार घेतल्याने दोन्ही राष्ट्रवादीचं सुत जुळत होतं. मात्र, काही नेत्यांसमोर या विलिनिकरणामुळे अडचणी निर्माण होणार होत्या. त्यांसाठी वन टू वन बैठक बोलवण्यात आली. ती देखील जयंत पाटलांच्या बंगल्यावर...
advertisement
नेत्यांसोबत वन टू वन बैठक
आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार अशोक पवार, माजी आमदार प्राजक्त तनपुरे आणि हर्षवर्धन पाटील या चार आमदारांना अडचणीचा सामना करावा लागणार होता. जितेंद्र आव्हाड यांचा आधीपासूनच विलिनिकरणाला विरोध होता. विलिनिकरण झाल्यास कळवा मुंब्राच्या मतदारांबाबत काय भूमिका घ्यावी किंवा काही वेगळा पर्याय होऊ शकतो का याबाबत देखील चर्चा झाली. तर अशोक पवार यांच्याविरुद्ध माऊली कटके यांच्याशी दिलमिलाईचं आव्हान होतं. तर प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघात पोटनिवडणुक लागणार त्यामध्ये कशा प्रकारे रणनीती असावी, यावर देखील चर्चा झाली. तर हर्षवर्धन पाटलांना दत्तामामा भरणे यांच्याशी समतोल साधायचा होता. त्यामुळेच हर्षवर्धन पाटलांच्या मुलीला म्हणजेच अंकिता पाटील यांना घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी सांगण्यात आलं होतं.
शरद पवारांसोबत बैठक
राष्ट्रवादीचं विलीनीकरण करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा पार पडला. त्यानंतर अमोल कोल्हे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली अन् जयंत पाटलांनी शरद पवारांसोबत बैठक घेऊन माहिती दिली. त्यानंतर 16 तारखेला शरद पवार गटातील नेत्यांची आणि अजित पवार यांची एक बैठक जयंत पाटलांच्या घरी बसवण्यात आली. या बैठकीच्या दिवशी ठरलं की, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडीत लढू आणि आघाडीत लढवल्यानंतर निकाल लागल्यानंतर आठ तारखेला जाहीर करू. पण काही कार्यक्रमांमुळे तारीख पुढं ढकण्यात आली.
अखेरची मिटिंग...
दरम्यान, बैठकीवेळी सर्वानुमते शरद पवारांची भेट घेऊ, असं ठरवण्यात आलं. शरद पवार यांना फोन केल्यावर त्यांनी सांगितलं की, धावपट्टी लहान आहे, त्यामुळे विमान उतरू शकणार नाही. त्यानंतर गाडीने सर्वांनी शरद पवारांची भेट घेतली अन् सकाळी आठ वाजता शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीच अनेक मुद्दे सांगितले गेले अन् अखेर 12 तारीख फिक्स करण्यात आली. जिल्हा परिषदेचा निकाल लागल्यानंतर आम्ही 12 तारखेला सगळं जाहीर करायचा असेल ठरवलं होतं, असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं.
