नेत्रावती एक्स्प्रेसला राजापूर स्थानकात थांबा मिळावा, यासाठी विविध प्रवासी संघटना आणि राजकीय पक्षांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर या प्रयत्नांना यश मिळालं असून एलटीटी-तिरुवनंतपूरम नेत्रावती एक्स्प्रेस आता राजापूर स्थानकात थांबणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे हे नक्की.
राजापूर रोड हे कोकण रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांसाठी हा प्रमुख थांबा आहे. आतापर्यंत नेत्रावती एक्स्प्रेस येथे थांबत नसल्याने प्रवाशांना रत्नागिरी किंवा कणकवली येथे उतरून पुढील प्रवास करावा लागत होता. आता या थांब्यामुळे मुंबई, गोवा आणि केरळकडे प्रवास करणं सोपं होणार असून प्रवाशांचा वेळही वाचणार आहे.
advertisement
राजापूर स्थानकावर गाडी थांबण्याची वेळ
नवीन वेळापत्रकानुसार, नेत्रावती एक्स्प्रेस राजापूर स्थानकात सायंकाळी 7.40 वाजता आगमन होऊन 7.42 वाजता सुटेल, तर परतीच्या प्रवासात सकाळी 7.38 वाजता आगमन होऊन 7.40 वाजता मार्गस्थ होईल.
