भारतीय सैन्याच्या डायरेक्टरेट जनरल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड मॅकेनिकल इंजीनिअर्स (DG EME) कडून ग्रुप C अंतर्गत विविध सिव्हिलिअन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 194 पदांवर भरती केली जाणार आहे. इलेक्ट्रिशियन (Highly Skilled-II), इलेक्ट्रिशियन (Power) (Highly Skilled-II), टेलिकॉम मेकॅनिक (Highly Skilled-II), इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक, व्हेईकल मेकॅनिक (Armoured Fighting Vehicle), टेलीफोन ऑपरेटर, मशिनिस्ट (Skilled), फिटर (Skilled), टिन आणि कॉपर स्मिथ (Skilled), अपहोल्स्ट्री (Skilled), वेल्डर (Skilled), स्टोअर कीपर, निम्न श्रेणी लिपिक (LDC), फायरमन, कुक , ट्रेड्समन मेट, वॉशरमन या रिक्त पदांवर ही नोकर भरती केली जाणार आहे.
advertisement
जाहिरात निघालेल्या नोकरभरतीतील पदांसाठी 10वी, 12वी आणि ITI अशी शैक्षणिक पात्रता पूर्ण हवी. कोणकोणत्या पदासाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता हवी, याची माहिती अर्जदारांनी अर्ज भरण्यापूर्वी जाहिरातीची PDF वाचून एकदा घ्यावी. सर्वच पदांसाठीची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षांपर्यंत ठरवण्यात आली आहे, पण खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना वगळता अनुसूचित जाती- जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदावारांना त्यांच्या वयामध्ये 3 ते 5 वर्षे सूट दिली आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन नसून ऑफलाईन आहे. इच्छूक उमेदवारांसाठी अर्जाची लिंक बातमीमध्ये देण्यात आली आहे. भरलेला अर्ज कुठे पाठवायचा याची माहिती अर्जदारांना जाहिरातीमध्ये मिळेल. अर्जाची आणि जाहिरातीची लिंक बातमी देण्यात आली आहे.
भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी 03 ऑक्टोबर 2025 रोजी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येणार नाही. अर्ज पाठवण्याच्या पत्त्यासाठी उमेदवारांना जाहिरात एकदा पाहावी लागेल. अद्याप परीक्षेच्या तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. परिक्षेच्या काही दिवस अगोदरच उमेदवारांना हॉलतिकिट मिळेल. भरतीमध्ये उमेदवारांच्या नियुक्तीसाठी 150 मार्कांची लेखी परीक्षा आयोजित केली जाईल. तसेच, आवश्यकता असल्यास कौशल्य चाचणी सुद्धा घेण्यात येईल. त्यानंतर, उमेदवारांची फिजिकल टेस्ट आणि डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल. शेवटी, उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करून अंतिम निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना 18,000 ते 25,500 इतका पगार मिळेल. तो सुद्धा भारतीय लष्कराच्या नियमामध्ये मिळत असणाऱ्या सर्व भत्त्यांनुसार...