रत्नागिरीच्या गुहागर मधील चिखली गावामध्ये नवीन वर्षाची सुरुवात कुत्र्याच्या मूर्तीच्या पूजनाने होते. ही प्रथा आहे गुहागर तालुक्यातील चिखली गावातील चांदिवडे वाडी मधली आहे. इथे नवीन वर्षाची सुरुवात बाला नावाच्या कुत्र्याच्या मूर्तीच्या पूजनाने होत असून या कुत्र्याच्या स्मृती प्रित्यर्थ गावकऱ्यांनी त्याचे मंदिरही बांधले आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या पूर्वजांनी एक कुत्रा पाळला होता आणि तो कुत्रा जंगली शापदांपासून त्यांच्या गुरांचे व जांगळ्यांचे म्हणजे गुर राखणाऱ्यांचे रक्षण करायचा म्हणून त्याचे आम्ही जांगळदेव नाव ठेवले असून वर्षाच्या सुरुवातीलाच त्याच्या स्मृती प्रित्यर्थ सत्यनारायणाची पूजा घालून महाप्रसादही करतो.
advertisement
बाला आमच्या गावाची जंगली श्वापदांपासून रक्षण करायचा त्याचबरोबर आमच्या गुराख्यांचेही रक्षण करायचा. तो जेव्हा मृत्यू पावला त्याला ज्या ठिकाणी दफन केले त्याच ठिकाणी आम्ही मंदिर बांधले आहे, एका कुत्र्याच्या नावाने मंदिर बांधून दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीलाच त्याची मनोभावे पूजा अर्चना करणे हा अनोखा प्रकार गुहागर तालुक्यातील चिखली गावातील चांदिवडेवाडी मागील कित्येक वर्ष करीत आहेत. त्यामुळे या घटनेची चर्चा सर्वदूर सूरू आहे.