या भरतीअंतर्गत संस्थेच्या 14 पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. ज्यामध्ये 'गट ब' ची 2 पदं आणि 'गट क' ची 12 पदं निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी https://nitdelhint.samarth.edu.in/index.php/site/login या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरायचा आहे. 'गट ब'मध्ये टेक्निकल अस्टिस्टंट पदासाठी भरती आहे, तर 'गट क'मध्ये सिनियर टेक्निशियन, सिनियर असिस्टंट, टेक्निशियन, कम्प्यूटर ॲप्लिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मॅकेनिकल इंजिनिअरिंग, एरोस्पेस इंजिनिअरिंग, ज्युनियर असिस्टंट, लॅब अटेंडंट आणि ऑफिस अटेंडंट अशा वेगवेगळ्या पदांसाठी नोकरभरती केली जात आहे.
advertisement
खुला प्रवर्ग, अनुसूचित जाती- जमाती, इतर मागास वर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग या प्रवर्गांमध्ये संपूर्ण 14 जागा विभाजित करण्यात आली आहेत. कोणकोणत्या पदासाठी कोणकोणते शिक्षण लागत आहे, या बद्दलच्या सविस्तर माहितीसाठी अर्जदारांनी जाहिरातीच्या PDF वर एकदा नजर टाकायची आहे. त्याप्रमाणेच नोकरीसाठी अर्ज करावा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया असून अर्ज शुल्क प्रक्रिया सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे. अर्ज भरण्याची आणि अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख एकच असणार आहे. अर्ज शुल्क आणि 18 टक्के जीएसटी अशी अर्ज शुल्काची रक्कम अर्जदारांना ऑनलाइन पद्धतीने द्यायची आहे.
खुला प्रवर्ग, इतर मागास वर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग या अर्जदारांना 1000 आणि 18 टक्के जीएसटी म्हणजेच 180 रूपये असे एकूण 1180 रूपये इतके अर्ज शुल्क भरायचे आहे. तर, अनुसूचित जाती- जमाती प्रवर्गातील अर्जदारांना 500 आणि 18 टक्के जीएसटी म्हणजेच 90 रूपये असे एकूण 590 रूपये इतके अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. भरतीप्रक्रियेमध्ये वयोमर्यादा नमूद करण्यात आलेली नाही. यामुळे अनेक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेमध्ये अर्ज भरता येणार आहे. 'गट ब' साठी 35,400 ते 1,12,400 इतका पगार असणार आहे, तर 'गट क'साठी 18,000 ते 81,100 पर्यंत पगार असणार आहे. 'गट क' अनेक पदं आहेत, पदाप्रमाणे अर्जदाराला पगार मिळेल.