आधीच लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार की नाही यावरुन द्विधा मनस्थिती आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस यांनी निकष आणखी कठोर करणार, कागदपत्रांची पुन्हा पडताळणी होणार असे संकेत दिले, तर अदिती तटकरे यांनी तक्रार आली तरच बघू असं म्हटलं, त्यामुळे नेमकं काय होणार याचा संभ्रम होता. आता याच दरम्यान नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
advertisement
नितेश राणे यांनी लाडकी बहीण योजनेवर जे वक्तव्य केलं त्याने खळबळ उडाली आहे. या वक्तव्यानंतर नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. आमदार नितेश राणे यांनी लाडकी बहीणवरुन चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले, निवडणुका आल्या की त्यांना आपला धर्म प्रिय असतो मात्र लाडकी बहीणच्या योजनाचा फायदा या लोकांनी घेतला.
या योजनेचा फायदा दोन अपत्य असणा-याना या योजनेचा फायदा देऊ नका अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार आहे. नितेश राणे यांनी नाव न घेता दोन मुलं असलेल्या मुस्लीम कुटुंबांना वगळावं अशी विनंती केली आहे. या योजनेतून आदिवासी बांधवांना सूट द्या, मुस्लीम सोडून दोन आपत्य असणाऱ्या लोकांपर्यंत ही योजना पोहोचणार असा निकषात बदल करा असं नितेश राणें एका भाषणादरम्यान बोलले आहेत.
नितेश राणेंच्या या वक्तव्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. सरकारी योजनांचा लाभ हे घेतात आणि निवडणुकीच्या वेळी मुस्लीम धर्म आधी राजकारण नंतर असं म्हणतात अशी टीकाही त्यांनी केली आहे.