कसा असेल महामार्ग?
या प्रकल्पाविषयी माहिती देताना गडकरी यांनी सांगितलं की, आम्ही पुणे ते संभाजीनगर हा नवीन एक्स्प्रेस हायवे बांधत आहोत. यासाठी १६ हजार ३१८ कोटींचा खर्च येणार आहे. याचा एमएयू झाला असून पहिला रस्ता पुणे, अहिल्यानगर आणि संभाजीनगर असा असणार आहे. तो रस्ता आधी पूर्णपणे चांगला करणार आहे. यावर काही ठिकाणी पूल बांधले जाणार आहेत. यासाठी दोन हजार कोटी खर्च केले जाणार आहेत.
advertisement
या व्यतिरिक्त आपल्याला दुसरा रस्ता शिक्रापूर येथून जाणार आहे. हा रस्ता अहिल्यानगरच्या बाहेरून थेट बीड जिल्ह्यात जाईल आणि तिथून तो संभाजीनगरपर्यंत जोडला जाईल. हा ग्रीन फिल्ड हायवे असणार आहे. या हायवेसाठी १६ हजार ३१८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात सगळ्या गोष्टी जवळपास पूर्ण झाल्या आहेत. फक्त तेथील एका टोलचा निर्णय व्हायचा बाकी आहे. यासाठी अजून दोन तीन वर्षांचा कालावधी आहे. तो शिफ्ट करायचा आहे. तो शिफ्ट झाला की या प्रकल्पाचं काम सुरू होईल.
हा रस्ता तयार झाला तर संभाजीनगर ते पुणे अंतर केवळ दोन तासात पार करता येणार आहे. तर संभाजीनगर नागपूर हे अंतर अडीच तासांत पार करता येणार आहे. एकूणच काय तर हा एक्स्प्रेस हायवे पुणे ते नागपूर असा होणार आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील इतरही काही आगामी प्रकल्पांची माहिती दिली.
