ऑनलाईन पद्धतीने NPCIL कंपनीमध्ये इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून 122 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. डेप्युटी मॅनेजर आणि ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर अशा पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या दोन्हीही पदांवर एकूण 122 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. डेप्युटी मॅनेजर पदासाठी वेगवेगळ्या पदांवर भरती होणार आहे. भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागांतर्गत एनपीसीआयएल या एका प्रायव्हेट सेक्टरमधील कंपनीमध्ये, मानव संसाधन (HR), वित्त आणि लेखा (F&A), करार आणि साहित्य व्यवस्थापन (C&MM), आणि कायदेशीर यांसारख्या पदांसाठी उप व्यवस्थापक (Deputy Manager) आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक (Junior Hindi Translator) या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
advertisement
इच्छुक उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. या भरतीत एकूण 114 रिक्त जागा गट 'अ' (डेप्युटी मॅनेजर- उप व्यवस्थापक) आणि 8 जागा गट 'ब' (ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेट- कनिष्ठ हिंदी अनुवादक) पदांसाठी आहेत. त्यामुळे ही भरती एकूण 122 रिक्त जागांसाठी होत आहे. भरतीच्या माध्यमातून एकूण 10 बॅकलॉग आणि 112 अशा एकूण 122 नवीन रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 08 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झालेल्या अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर 2025 आहे. इच्छुक उमेदवारांनी NPCIL च्या अधिकृत वेबसाइट www.npcilcareers.co.in वरून ऑनलाइन अर्ज भरावा. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 7 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता सुरू झाली असून 27 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 05:00 वाजता बंद होईल.
डेप्युटी मॅनेजर पदांसाठी, अर्जदाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी आणि 60% गुणांसह दोन वर्षांचा पूर्ण वेळ एमबीए, पदव्युत्तर पदवी, डिप्लोमा, व्यवस्थापन अभ्यासातील पदव्युत्तर पदवी, MSW किंवा एकात्मिक MBA असणे आवश्यक आहे. विशिष्ट पदांसाठी विशिष्ट स्पेशलायझेशनची आवश्यकता आहे. ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेट पदासाठी, हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी आणि विशिष्ट विषय संयोजन किंवा अनुवादामध्ये डिप्लोमा/ प्रमाणपत्र तसेच संबंधित अनुभव आवश्यक आहे. अनुभवासाठी विशिष्ट वर्षांची आवश्यकता नाही. डेप्युटी मॅनेजर पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे, तर ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेट पदासाठी 21 ते 30 वर्षे आहे. अनुसूचित जाती- जमातींसाठी 5 वर्षे, इतर मागास वर्गांसाठी 3 वर्षे, दिव्यांग व्यक्तींसाठी 10- 15 वर्षे, 1984 च्या दंगलीतील पीडितांच्या अवलंबितांसाठी 5 वर्षे, कारवाईत शहीद झालेल्या संरक्षण कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांसाठी आणि माजी सैनिकांसाठी 5 वर्षांची वयोमर्यादा शिथिलता आहे.
खुला प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना नॉन- रिफंडेबल अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. कोणत्याही परिस्थितीत अर्ज शुल्क परत केले जाणार नाही. डेप्युटी मॅनेजर पदांसाठी शुल्क 500 रुपये आणि ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेट पदासाठी 150 रुपये आहे. अनुसूचित जाती- जमाती, अपंग व्यक्ती, माजी सैनिक, डीओडीपीकेआयए, महिला उमेदवार आणि एनपीसीआयएल कर्मचारी यांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही, त्यांना अर्ज शुल्कातून सूट मिळणार आहे. डेप्युटी मॅनेजर पदासाठी वेतन मॅट्रिक्सच्या स्तर 10 मध्ये नियुक्त केले जाईल, ज्याचा मूळ पगार 56,100 रुपये असेल आणि अंदाजित मासिक वेतन 86,955 रुपये असेल. ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेट पदासाठी स्तर 06 मध्ये नियुक्त केले जाईल, ज्याचा मूळ पगार 35,400 रुपये आणि अंदाजित मासिक वेतन 54,870 रुपये असेल. या वेतनात महागाई भत्त्याचा समावेश आहे आणि ते सरकारी सूचनेनुसार बदलू शकतात.
