वर्धा : दिवाळीनंतर पतंगबाजीला उधाण आलं. पण पाच-दहा रुपयाच्या पतंगाबाजीमुळे निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. दरवर्षीप्रमाणे मांजामुळे जीव जाण्याच्या तसेच गंभीर जखमा होण्याच्या घटना घडतच असतात. वर्ध्यात चायनीज मांजाने शहरात एका व्यक्तीचा गळा चिरून मृत्यू झाला आहे. आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. तर अनेक जण मांजामुळे जखमी झाले आहे.
वर्धा शहरात चायना मांजाने एका शेतकऱ्याचा गळा चिरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेतातून फवारणी करून घराकडे येत असताना गळ्यात चायनीज मांजा अडकल्याने शेतकरी सुभाष शेलुटे यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मांजाचा गळाला फास बसला आणि गळा चिरला गेला, त्यामुळे जागीच मृत्यू झाला. तर शहरात आज सकाळपासून पतंग उडवण्याच्या मस्तीमुळे अनेकजण जखमी झाले आहेत.
advertisement
आठवड्याभरात दुसरी घटना
शेतातून घरी दुचाकीवर येत होते. दुचाकीवर असल्यानं मांजा मानेभोवती गुंडाळला गेला. मांजाचा गळाला फास बसला आणि गळा चिरला गेला. मांज्यामुळं गळा कापल्या गेल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यामध्ये शेतकरी सुभाष शेलुटे यांचा जागेवरच मृत्यू झाला. देवळी तालुक्यातील भिडी इथली दुसरी घटना आहे. दोन दिवसातील ही दुसरी घटना असून आणखी किती लोकांचा नॉयलान मांजा जीव घेणार असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
पोलिसांच्या धाकाला न जुमानता मांजा विक्री
पोलिसांकडून सातत्याने नायलॉन मांजावर कारवाई सुरु आहे. तरीही पोलिसांच्या धाकाला न जुमानता मांजा विक्री सुरुच होती. शहरातील ठोक मांजा विक्रेते पावसाळ्यादरम्यान मांजा ऑर्डर करतात. त्यानंतर त्यांच्याकडून किरकोळ विक्रेते खरेदी करतात. तसेच त्यानंतर डिसेंबर महिन्यांपासून याची विक्री जोर धरत असते. मात्र पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका फक्त जानेवारीतच कारवाई करतात. त्यामुळे ज्यांनी पूर्वीच मांजा विकला त्यावर नियंत्रण येत नाही. पोलिसांनी आपल्या नेटवर्कच्या सहाय्याने ठोक विक्रेत्यांवर नजर ठेवून मांजा शहरात दाखल होताच कारवाई केली तर असे अनेकांचे जीव वाचला असता. तसेच शहरात या मांज्याचे वितरण होण्यापूर्वीच जप्ती करता आली असती असा आक्रोष नागरिकांनी व्यक्त केला आहे.
