काय आहे नेमकी घटना?
परंडा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वडनेर गावात पूर आला होता. येथील एका घरात पाणी शिरल्याने एकाच कुटुंबातील चार व्यक्ती, ज्यात एक लहान मुलगा आणि एक वृद्ध महिला यांचा समावेश होता, मध्यरात्री २ वाजल्यापासून आपल्या घराच्या छतावर अडकून पडल्या होत्या. अन्न-पाण्याविना हे कुटुंब मदतीची वाट पाहत होते.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, परंडा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वडनेर गावात पूरस्थिती निर्माण झाली होती. येथील एका घरात पाणी शिरल्याने एकाच कुटुंबातील चार जण रात्री २ वाजेपासून आपल्याच घराच्या छतावर अडकून पडले होते. यामध्ये एक आजी, एक दोन वर्षांचा लहान मुलगा आणि इतर दोन व्यक्तींचा समावेश होता. अन्न-पाण्याविना हे कुटुंब मदतीच्या अपेक्षेत होते.
या घटनेची माहिती मिळताच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी लगेचच एनडीआरएफच्या टीमला बोलावले आणि त्यांच्यासोबत बचावकार्यात उतरले. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर, रात्री ८ वाजण्याच्या सुमारास या कुटुंबाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.
खासदारांची भावनिक फेसबुक पोस्ट
या यशस्वी बचावकार्यानंतर खासदार निंबाळकर यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिले की, ''आज वडनेर येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील एक आजी, २ वर्षांचा मुलगा व २ व्यक्ती रात्री २ पासून पूर्ण पाण्याने वेढले होते व स्वतःच्या घरावर अन्न-पाण्याविना मदतीच्या अपेक्षेने अडकले होते. एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने मी स्वतः या कार्यात सहभागी होऊन कुटुंबाला सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी आज संध्याकाळी ८ वाजता यश आल्याने मनाला खूप समाधान मिळाले!"
त्यांनी पुढे एनडीआरएफचे जवान आणि गावकऱ्यांचे आभार मानत म्हटले, "या कार्यात एनडीआरएफच्या जवानांनी व गावकऱ्यांनी देखील कष्ट व मेहनत घेऊन सदरील बचावकार्य यशस्वीरित्या पार पाडले, याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व अभिनंदन!"