धाराशिव ड्रग्स प्रकरणात पिंटू गंगणे याच्यावर जोरदार आरोप झाले. नंतर त्याने राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून त्याचा बचाव करण्यात येऊ लागला. चार दिवसांपूर्वी त्याला तुळजापूर नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली. या सगळ्या प्रकारावर ओमराजे निंबाळकर यांनी राणा पाटलांवर जोरदार प्रहार केले.
जनाची नाही, मनाची तरी लाज वाटायला पाहिजे, ओमराजेंचा बोचरा वार
advertisement
"मराठीत म्हण आहे की नाक कापलं तरी भोक शिल्लक आहे... आरोपीचा बचाव करताना आणि सुप्रिया सुळे यांना पत्र लिहिताना राणा पाटील यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे होती", असा बोचरा वार खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे.
RSS ने दुसरा उमेदवार सुचवला होता पण तरीही...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दुसरा उमेदवार सुचवला असताना देखील राणा पाटील यांनी आपल्या मर्जीनेच तुळजापूरमध्ये ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी हा उमेदवार दिला असल्याचा आरोप ओमराजे निंबाळकर यांनी केला. कोणाच्या आशीर्वादाने ड्रग्ज प्रकरणातील आरोपी अटक करण्यात उशीर झाला आणि ही मंडळी कशी बाहेर आली हे जनतेला माहीत असून या निवडणुकीत जनता याचा हिशोब करणार असल्याचा दावा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे.
