TRENDING:

एक दिवस हिजाब घालणारी महिला देशाची पंतप्रधान बनेल, पण मी...' ओवेसींचं वक्तव्य

Last Updated:

एमआयएमच्या उमेदवारासाठी असाउद्दीन ओवेसी यांची प्रचारसभा सोलापूरमध्ये पार पडली. यावेळी ओवेसी यांनी भाजप आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रितम पंडित, प्रतिनिधी
(asaduddin owaisi)
(asaduddin owaisi)
advertisement

सोलापूर :  सोलापूर महापालिका निवडणुकीला यंदा खूनाच्या घटनेनं गालबोट लागलं आहे. पण, दुसरीकडे सत्ताधारी आणिि विरोधकांच्या प्रचार सभांचा धडाका सुरूच आहे. अशाच एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असाउद्दीन ओवेसी यांची सभा पार पडली.  "पाकिस्तानच्या घटनेत लिहलंय की एकच समाजाचा माणूस राष्ट्रध्यक्ष बनू शकतो, इतर कोणी नाही.  पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्याा राज्यघटनेत कोणीही भारतीय पंतप्रधान बनू शकतो.  एक दिवस असा येईल हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान बनेल' असं वक्तव्य ओवेसी यांनी केलं.

advertisement

एमआयएमच्या उमेदवारासाठी असाउद्दीन ओवेसी यांची प्रचारसभा सोलापूरमध्ये पार पडली. यावेळी ओवेसी यांनी भाजप आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

"सोलापूरला आपण पुण्यासारखे सुंदर बनवू शकतो. भाजपचे लोकं इथं इतक्या वर्षांपासून आहेत, काहीच करत नाही. पाकिस्तानच्या घटनेत लिहलंय की एकच समाजाचा माणूस राष्ट्रध्यक्ष बनू शकतो, इतर कोणी नाही. पण बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेत कोणीही भारतीय पंतप्रधान बनू शकतो. एक दिवस असा येईल हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान बनेल.  तो दिवस बघण्यासाठी की कदाचित जिवंत नसेल पण हा दिवस एक ना एक दिवस येईल, असा विश्वास ओवेसींनी बोलून दाखवला,

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतात करा गार AC मध्ये काम, चक्क ट्रॅक्टरला बसवला एसी, किती आला खर्च? Video
सर्व पहा

एमआयएम गरिबामुळे सुरू झाली त्यामुळे गरिबांसाठी काम करते. कोणी तरी म्हटलं की, माझ्या शेरवानीला हात लावणार आहे.  साहेब छेडछााड करायचं नाही. तुमचा जो राजकीय बाप आहे, अजित पवार यांना समोर बसा म्हणा. तीन मिनिटात मुका (गुंगा) नाही केलं तर सांगा. देशाच्या संसदेत बोलणारा मी आहे. अजित पवार हे नरेंद्र मोदींच्या गोदीत बसले आहे.  अजित पवारला व्होट म्हणजे मोदींना व्होट आहे. अजित पवारांना व्होट म्हणजे मोदींनी आणलेल्या वक्फ कायद्याला समर्थन आहे. अजित पवारांना दर्गा, मस्जिदने काही घेणे देणे नाही आपल्याला आहे. मोदी, शिंदे, अजित पवार ही त्रिमूर्ती ही एकच आहेत. हे तुमच्यासमोर येऊन तुमच्या डोळ्यात धूळफेक करतील, अशी टीकाही ओवेसींनी केली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एक दिवस हिजाब घालणारी महिला देशाची पंतप्रधान बनेल, पण मी...' ओवेसींचं वक्तव्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल