TRENDING:

Ladki Bahin Yojana E-KYC: महिलांनो ऑनलाइन अर्ज भरताना जपून; छोट्या चुकीमुळे रिकामं होऊ शकतं तुमचं बँक अकाउंट

Last Updated:

Ladki Bahin Yojana e-KYC : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC प्रक्रिया सुरू आहे. अनेक महिला ऑनलाइन अर्ज भरत आहेत. मात्र, या प्रक्रियेत छोट्या चुका टाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र महिलांसाठी आता ई केवाईसी प्रक्रिया सक्तीची केली आहे. सरकारने या प्रक्रियेसाठी दोन महिन्यांची मुदत निश्चित केली आहे. या कालावधीत सर्व लाभार्थींनी ई केवाईसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. अनेक महिलांनी ऑनलाइन पडताळणी करण्यास सुरुवात केली असली तरी, या संधीचा गैरफायदा घेऊन काही फसवणूक करणारे गूगलवर बनावट वेबसाइट्स तयार करत आहेत. अशा साइटवर माहिती भरल्यास खात्यातील पैसे गमावण्याचा मोठा धोका संभवतो.
News18
News18
advertisement

ई केवाईसीचा नवा नियम आणि उद्दिष्ट्य

महिला आणि बाल विकास विभागाने नुकतीच घोषणा केली की या योजनेतील सर्व लाभार्थींनी दरवर्षी जून महिन्यात ई केवाईसी करणे आवश्यक असेल. यामागचं मुख्य कारण म्हणजे सरकारच्या तपासणीत जवळपास 26.34 लाख अपात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळले. यात पुरुषांचाही समावेश होता. त्यामुळे ही डिजिटल पडताळणी केवळ पात्र महिलांपर्यंतच लाभ पोहोचवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

advertisement

फक्त अधिकृत पोर्टलवरच करा ई केवाईसी

लाभार्थींनी लक्षात ठेवावे की ई केवाईसी करण्यासाठी केवळ सरकारने उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. त्यासाठी लिंक आहे: https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc

गूगल सर्चमध्ये दिसणाऱ्या इतर कोणत्याही लिंक्सवर क्लिक करू नये. कारण गेल्या काही दिवसांत hubcomut.in सारखी एक फसवी वेबसाइट समोर आली आहे. ही साइट ई केवाईसी संदर्भात माहिती शोधताना गूगलवर दिसते. जर कोणी लाभार्थी महिला अशा बनावट साइटवर आपली वैयक्तिक माहिती भरते तर तिचं बँक खाते रिकामं होऊ शकतं तसेच इतर वैयक्तिक माहिती हॅक होण्याचा धोका वाढतो.

advertisement

सायबर फसवणुकीचा धोका

या बनावट साइट्सद्वारे हॅकर्स महिलांची वैयक्तिक माहिती, आधार क्रमांक, बँक खाते तपशील मिळवतात. त्यानंतर खात्यातील पैसे काढले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे लाभार्थींनी जास्तीत जास्त सतर्क राहून अधिकृत पोर्टलवरच प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

अधिकाऱ्यांचा सल्ला

महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, ही प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक आणि महिलांच्या हिताची आहे. वेळेत ई केवाईसी पूर्ण केल्यास केवळ या योजनेचा लाभच नव्हे तर भविष्यात येणाऱ्या इतर सरकारी योजनांचाही लाभ मिळवणे सोपे होईल. त्यामुळे लाभार्थींनी कुठलाही विलंब न करता अधिकृत पोर्टलवर ई केवाईसी करावे.

advertisement

योजनेची पात्रता आणि उद्दिष्ट्य

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली. 21 ते 65 वयोगटातील आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिलांना या योजनेसाठी पात्रता आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा थेट त्यांच्या बँक खात्यात ₹1,500 ची आर्थिक मदत दिली जाते. सध्या या योजनेचे सुमारे 2.25 कोटी महिला लाभार्थी आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ladki Bahin Yojana E-KYC: महिलांनो ऑनलाइन अर्ज भरताना जपून; छोट्या चुकीमुळे रिकामं होऊ शकतं तुमचं बँक अकाउंट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल