माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन बोगस मतदारांच्या यादीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. ' नालासोपारामध्ये लोकसभा निवडणुकीपासून ते विधानसभेपर्यंत 75 हजार मतदारसंख्या वाढली. एखाद्या मतदारसंघांमध्ये खास करून ग्रामीण भागातल्या 75000 मतदान होत नाही, आमच्याकडे 75 हजार मतं वाढली. उगाच चार महिन्यात एवढे 75000 मतदार कसे वाढले, असा काय चमत्कार झाला आहे ' असा सवाल ठाकूर यांनी उपस्थितीत केला.
advertisement
'तुम्ही बघितलं असेल सुषमा गुप्ता सहा वेळा फोटो आला. नालासोपाऱ्यामध्ये सुषमा गुप्ता, पूजा सिंग 63 वेळा नाव आहे, आता मला एक सांगा तुम्ही फोटो चेक करायचा आहे. सुनील यादव 53 वेळा, अखिलेश सिंग 47 वेळा यांचे फोटो चेक करायचे आहेत. पण एखादा पाटील, राहुल, हितेंद्र ठाकूर यांची डबल नाव का येत नाही. हीच नाव कशी आली आहे. 'हीच नाव कशी काय एवढी 45, 47, 53, 63 वेळा वाढली. ६ वेळा तर फोटो सुद्धा तेच आहे. ' असाही प्रश्न ठाकूर यांनी उपस्थितीत केला.
(हेही वाचा - 65 लाख मतदारांची नावं का वगळली? खुलासा करा, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला आदेश)
तसंच, आम्ही निवडणूक आयोगाकडे धक्के खाऊन, तसीलदार प्रांताकडे धक्के खाऊन छोटा फॉर्म भरून लाईनीत उभं राहून, फॉर्म दिला तरी ती लोकांची नावं येत नाही. मग निवडणूक आयोग कुठेतरी बाहेरून ऑनलाइन नावं घेते का? स्थानिकांची नाव जी लोकसभेला होती, ती विधानसभेला गायब झाली. अख्खी कुटुंबाची कुटुंब गायब झाली. लोकसभेला मतदान केलं, त्यांची नावं विधानसभेला गायब झाली. मग कशाला निवडणूक घेतात. त्यापेक्षा लोकांना सांगून टाका, निवडणुकीसाठी तुम्ही उमेदवार उभा करा आणि निकाल जाहीर करून टाका, तेवढाच निवडणुकीचा खर्च वाचेल. जे निवडून येतील ती लोक राज्य करतील', असा संतप्त सवालही माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.
