एटीएम मशीन ओढून नेताना चोरांचा व्हिडीओ समोर आला आहे. चाळीस लाख रुपयाच्या कॅश सह मशीन घेऊन चोरटे पसार झाले. ही धक्कादायक घटना उस्मानाबादमधून समोर आली आहे.
धाराशिव कळंब शहरात चोरट्यांनी चक्क स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम पळवलं आहे. आज पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी हे एटीएम चोरी केलं असून या एटीएम मध्ये 39 लाख रुपये एवढा कॅश असल्याचं बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. हे एटीएम चोरटे उचलून नेतानाचे सीसीटीव्ही फुटेज न्युज 18 लोकमतच्या हाती लागलं आहे.
advertisement
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोरीच्या साह्याने हे एटीएम मशीन चोरट्याने गाडीला बांधून तोडून नेलं आहे. एवढ्या रक्कम सह हे एटीएमच चोरटे घेऊन पसार होण्यात यशस्वी झाले असून भर चौकात ही घटना घडली असून पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेत. शहरातील सीसीटीव्ही व येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाची कसून चौकशी पोलीस करत आहेत. धाराशिव जिल्ह्यात या अगोदर एटीएम फोडीच्या घटना घडल्या होत्या मात्र चोरट्यांनी यावेळी एटीएम फोडली नसून एटीएम मशीनच घेऊन चोरटे पसार झाले आहे. आता हे चोरटे नेमके कोण व कुठल्या दिशेला गेलेत याचा तपास पोलीस करत आहेत.