खरं तर आज काही कामानिमित्त उपसरपंच शुभम वडे हे बोईसर जवळील सरावली ग्रामपंचायत कार्यालयात आले होते. या दरम्यान उपसरपंच शुभम वडे यांची ग्रामपंचायत कार्यालयातील लिपिक संकेत सावंत याच्यासोबत किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली होती. सूरूवातीला दोघांमध्ये शाब्दीक वाद सूरू होता.त्यानंतर या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले.
advertisement
शुभम वडे आणि संकेत सावंत या दोघांनी एकमेकांची कॉलर पकडली आणि हाणामारी करण्यास सूरूवात केली. या हाणामारी दरम्यान दोघांनी एकमेकांना ठोश्याबुक्क्यांनी देखील मारहाण केली होती.या दरम्यान काही लोकांनी देखील या मारहाणीत उडी घेतली होती. अख्खा ऑफिसभर हा सगळा राडा सूरू होता.ग्रामपंचायत कमी पण कुस्तीचा आखाडा वाटत होता.
या घटनेची माहिती इतर महिला आणि कर्मचाऱ्यांना कळताच त्यांनी बाहेर येऊन संपूर्ण घटना थांबवण्याचा प्रयत्न केला. यानंतर हा वाद मिटला आहे. या राड्याचा संपूर्ण व्हिडिओ आता समोर आला आहे. या प्रकरणी अद्याप तरी कोणतीही पोलीस तक्रार झाल्याची माहिती समोर आली नाही आहे. पण या घटनेने ग्रामपंचायतीची प्रतिमा मलिन होते आहे.