जेवणाची थाळी फक्त 30 रुपयांत, पुण्यात प्रसिद्ध ठिकाण, कधी दिलीये का भेट?
गावामध्ये अनेक जबाबदारीचे काम असणाऱ्या कर्त्या धर्त्याच्या पदासाठी नोकर भरती होणार आहे. जालना जिल्ह्यातील एकूण चार गावात वेगवेगळ्या उपविभागामध्ये भरती केली जाणार आहे. जालना, अंबड, परतूर आणि भोकंदर या उपविभागामध्ये एकूण 722 पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये जालन्यात 185 'पोलिस पाटील' पदे रिक्त आहेत. तर, अंबडमध्ये 183 'पोलिस पाटील' पदे, परतूरमध्ये 153 'पोलिस पाटील' पदे, भोकंदरमध्ये 201 'पोलिस पाटील' पदे रिक्त आहेत. या नोकर भरतीची सुरूवात 15 सप्टेंबरपासून झालेली आहे. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे.
advertisement
डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानं सुटलं काम, ढोकळा सेंटरमधून होते 80 हजारांची उलाढाल
अर्जदाराच्या वयाची अट किमान 25 इतकी आहे, तर कमाल वय 45 इतके हवे आहे. नोकरीचे ठिकाण जालना जिल्हा असून स्थानिक रहिवाशी असलेल्या उमेदवारांना भरतीमध्ये प्रामुख्याने प्राधान्य दिले जाणार आहे. या शिवाय उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने असणार आहे, शिवाय अर्ज शुल्कही उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख आणि ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याची तारीख एकच असणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 800 रूपये फी आहे. तर इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना 600 रूपये फीचे शुल्क आहे. परीक्षेची तारीख सुद्धा जाहिरातीत नमुद करण्यात आली आहे. 12 ऑक्टोबर रोजी 'पोलिस पाटील' पदासाठी भरती केली जाणार आहे.