पनवेल महानगरपालिकेमध्ये 7 उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर भाजपच्या 7 जणांची बिनविरोध निवड झाली आहे, पण निवडणूक आयोगाकडून याची अधिकृत घोषणा व्हायची बाकी आहे. अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.
भाजपचे 7 उमेदवार बिनविरोध
1) नितीन पाटील
2) रुचिता लोंढे
advertisement
3) अजय बहिरा
4) दर्शना भोईर
5) प्रियंका कांडपिळे
6) ममता प्रितम म्हात्रे
7) स्नेहल ढमाले
पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुती एकत्र निवडणूक लढत आहे. एकूण 78 जागांपैकी भाजप सर्वाधिक 71, शिवसेना 4, राष्ट्रवादी काँग्रेस 2 आणि आरपीआय आठवले गट एका जागेवर रिंगणात आहे. तर दुसरीकडे महाविकासआघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष मोठा भाऊ आहे. पनवेलमध्ये शेकाप 33, शिवसेना उबाठा 19, काँग्रेस 12, राष्ट्रवादी शरद पवार 7, मनसे 2, सपा 1 आणि वंचित बहुजन आघाडी एक जागेवर निवडणूक लढत आहे.
याआधी 2017 साली पनवेल महानगरपालिकेमध्ये निवडणूक झाली होती, तेव्हा भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली होती. भाजपला 2017 साली 51 जागा मिळाल्या होत्या, तर शेकापला 23, काँग्रेसला 2 आणि राष्ट्रवादीला 2 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.
