TRENDING:

Parbhani Lok Sabha : महादेव जानकरांकडे नेमकी संपत्ती किती? शपथपत्रातून माहिती समोर

Last Updated:

Parbhani Lok Sabha : महायुतीचे परभणी लोकसभा उमेदवार महादेव जानकर यांच्याकडे पाच कोटी रुपयांच्या आसपास संपत्ती असल्याचे निवडणुकीच्या घोषणापत्रातून उघड झाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
परभणी, (विशाल माने, प्रतिनिधी) : महायुतीचे परभणी लोकसभा उमेदवार महादेव जानकर यांनी आपल्या उमेदवारी अर्जामध्ये आपल्याकडे असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीचा उल्लेख केला आहे. जानकर यांच्याकडे पाच कोटीच्या जवळपास संपत्ती असल्याचं समोर आला आहे. महादेव जानकर हे अनेक ठिकाणी स्वतःचा फकीर म्हणून उल्लेख करतात. नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महादेव जानकर यांना फाटका असा शब्दप्रयोग केला होता. आता शपथपत्रातील संपत्तीमुळे चर्चा सुरू झाली आहे.
महादेव जानकरांकडे नेमकी संपत्ती किती?
महादेव जानकरांकडे नेमकी संपत्ती किती?
advertisement

महायुतीचे परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांनी परभणी लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जामध्ये जानकर हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पळसवाडीचे असल्याचं उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनी वालचंद कॉलेज सांगली येथून डिप्लोमा इन इलेक्ट्रिक इंजीनियरिंगची डिग्री पूर्ण केली आहे. तर व्यवसाय म्हणून शेती असा देखील जाणकारांनी आपल्या उमेदवारी अर्जामध्ये उल्लेख केलाय. जानकर यांच्या नावावर 18 एकर 14 गुंठे एवढी शेती असून चल आणि अचल, दोन्ही मिळून जवळपास पाच कोटी रुपयांची संपत्ती त्यांच्याकडे असल्याचे शपथपत्रात नमूद करण्यात आला आहे. आणि त्यामुळे स्वतःला फकीर म्हणणाऱ्या महादेव जानकर यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती असल्याच आता उघड झाला आहे.

advertisement

महादेव जानकर यांनी आपला निवडणूक अर्ज भरताना आपली ही सर्व संपत्ती दाखवली आहे. त्यामध्ये जानकर यांच्याकडे चलसंपत्ती 1 कोटी 25 लाख 10 हजार 598 रुपये एवढी असल्याचं सांगण्यात आला आहे. तर कॅश इन हॅन्ड म्हणून 27 हजार 330 रुपये तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 51 लाख 66 हजार 779 रुपयांची एफडीआर तर गोल्ड बाँड स्कीम मध्ये 791 ग्राम सोन्यात गुंतवणूक केली असल्याचं सांगण्यात आला आहे. त्याचं मूल्य 29 लाख 96 हजार 308 रुपये एवढा आहे. जानकर यांच्या पीपीएफ खात्यामध्ये देखील 2 लाख 25 हजार 845 रुपये आहेत. सोबतच जानकर यांच्याकडे 200 ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने असल्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे. बाजार मूल्यानुसार त्याची किंमत 13 लाख 65 हजार इतकी आहे.

advertisement

वाचा - 'सांगलीत मैत्रीपूर्ण लढतीची भाषा करू नये अन्यथा..' ठाकरे गटाचा काँग्रेसला गंभीर इशारा

महादेव जानकर यांच्याकडे अचलसंपत्ती देखील 3 कोटी 62 लाख 99 हजार 760 रुपयांची असल्याचं त्यांनी घोषणा पत्रात सांगितला आहे. यामध्ये शेतजमीन, रेसिडेन्शिअल प्रॉपर्टी, कमर्शियल प्रॉपर्टी याचा समावेश आहे. आपल्या उमेदवारी अर्जामध्ये महादेव जानकर यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची देखील माहिती दिली आहे. त्यात कोणत्याही गंभीर स्वरूपाचे गुन्हे नसून, शासकीय अधिकाऱ्यांनी भाषण केल्याबद्दल गुन्हा दाखल केल्या तर सांगण्यात आला आहे. सोबतच जानकर यांच्यावर कोणत्याही प्रकारचं कर्ज नसल्याचेही त्यांनी नमूद केला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, रविवारी शेवगा आणि गुळाला किती मिळाला दर?
सर्व पहा

महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यादेखील परभणी मध्ये आल्या होत्या. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकर यांना फकीर म्हणून संबोधले होते आणि त्यामुळे आता पाच कोटी रुपयांचा फकीर, अशी महादेव जानकर यांच्या विषयी चर्चा परभणी मध्ये होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/परभणी/
Parbhani Lok Sabha : महादेव जानकरांकडे नेमकी संपत्ती किती? शपथपत्रातून माहिती समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल